Movies-भारतीय सिनेमा सर्वांगीण बहरतोय…! #1 – Best

movies

 Movies

भारतीय सिनेमा सर्वांगीण बहरतोय…!

(Indian movies)

जीवनाला खरा अर्थ प्राप्त होण्यासाठी मित्रांनो जीवनात कला असणे महत्वाचे आहे.आपण कलाकार नसलो तरी चालतो परंतु कलेची कदर असली तरीसुद्धा मन भरून  जाते.जीवन कृतार्थ होते.भारतामध्ये तीन गोष्टी खूप लोकप्रिय आहेत, एक म्हणजे राजकारण, दुसरे म्हणजे क्रिकेट आणि तिसरी म्हणजे अर्थातच चित्रपट… 

आबालवृद्धांना चित्रपट (movies) ही कला मोहून टाकते.एखादी आपली वृद्ध आजीसुद्धा शरद तळवलकर यांच्या विनोदाला खळखळून हसते तर एखादे वृद्ध आजोबा सुद्धा अमिताभ बच्चन यांचा एक्सीडेंट झाल्यावर मनातून हळहळतात.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आसाम पासून महाराष्ट्र पर्यंत आणि गोव्यापासून गुजरात पर्यंत 1983 मध्ये जेव्हा अमिताभ कुली चित्रपटासाठी शुटिंग करत असताना अपघात झाला तेव्हा संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त झालीच उपास-तापास ही झाले .

महाराष्ट्रातीलच उदाहरण घ्यायचे म्हटले तर अलका कुबलचा माहेरची साडी जेव्हा रिलीज झाला तेव्हा अजूनही मला आठवते अक्षरशा ट्रॅक्टर भरून माय भगिनी यांच्यासह पुरुष सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी येत होते .अक्षरशः रोज पाच-सहा चित्रपटांचे खेळ व्हायचे.अलका कुबल ही महाराष्ट्राची लाडकी लेक ठरली.1990 च्या दशकातील आणखीन एक छान उदाहरण आहे.

अल्लू अर्जुन चा आर्या चित्रपट आला आणि त्यातील भाषा आपल्याला समजली नाही परंतु तो देशभर तुफान चालला तो मनाला स्पर्शून गेला.सर्वांगीन मनोरंजन करणारा तो चित्रपट होता.1997 च्या आसपास सत्या या चित्रपटाने राम गोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला सत्त्या चित्रपट (movies)  कलात्मक पातळीवर अंडरवर्ल्ड चे विश्लेषण करणारा होता.त्या चित्रपटालाही इतके भरभरून प्रेक्षक लाभले की जणू तो सत्या चित्रपट हा मैलाचा दगड ठरला अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट शहंशाह सुपरस्टार स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन यांच्याही आवडत्या चित्रपटांच्या रांगेत कागज के फूल बरोबर सत्या या चित्रपटाने स्थान मिळवले.

 टायटॅनिक हा तर इंग्रजी चित्रपट होता नंतर तो हिंदी मध्ये आला परंतु त्या चित्रपटांनीही भारतात अक्षरशः रौप्यमहोत्सवी यश मिळवले ही सर्व उदाहरणे सांगण्याचे सुरुवातीलाच कारण म्हणजे भारतीय चित्रपट सुरुवातीपासूनच लोकप्रिय होता परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये तो सर्व बाजूंनी बहरतोय व्यवसायिक  कलात्मक मूल्य या पातळीवर तो सुवर्ण मध्य साधतोय व्यवसाय चित्रपट तर प्रसिद्ध होतेच लोकप्रिय होतेच परंतु त्याचबरोबर कलात्मक चित्रपटांचा समांतर चित्रपटांचा ही एक जमाना असतो आणि हे चित्रपट (movies) येत राहतात परंतु भारतीय चित्रपट फुलण्याची एक महत्त्वाची खूण म्हणजे कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट यांचा एक सुवर्णमध्य साधला जातोय.

 चालू युगातले कलाकार मग तो विकी कौशल असो तो राजकुमार राव असो कंगना राणावत असो भुमी पेडणेकर असो की मध्यम वयीन झालेला अक्षय कुमार असो या सर्व कलाकारांच्या चित्रपटांच्या निवडीवरून असे दिसते की चित्रपट (movies) सर्वच बाजूंनी बहरतोय.व्यवसाय आणि कला यांचा संगम साधने खूप जिकिरीचे असते आणि ते थोडे भीतीदायक ही असते निर्मात्यांना कलाकारांना ते बर्‍याचदा सुरक्षित वाटत नाही परंतु या भीतीवर मात करत अलीकडे भारतीय चित्रपट सर्वांगीन दृष्ट्या सुंदर होत चाललाय भक्ती मग ती देशभक्ती सुखी ईश्वरभक्ती तसेच ॲक्शन चित्रपट फॅमिली चित्रपट हे सर्व चित्रपट आपापल्यापरीने येत राहिले तुफान गाजले काही पडले. 

काही हिट काही सुपरहिट काही ब्लॉकबस्टर तर काही चित्रपट हे अलीकडच्या भाषेत सांगायला गेलं तर ऑल टाइम ब्लॉक बस्टर ठरले.1975 एक सुंदर घटना आहे एकाच वेळी शोले आणि जय संतोषी मा चित्रपट रिलीज झाले परंतु दोन्ही चित्रपट आपल्या पातळीवर अद्भुत होते दोन्ही चित्रपट आपापल्या पातळीवर दर्जेदार होते हे दोन्ही चित्रपट वेगळ्या धर्तीवरचे होते वेगळ्या धाटणीचे होते तरीही दोन्ही चित्रपट (movies) सुपरहिट झाले अशा अनेक गोष्टी भारतीय चित्रपटात आहेत.ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत आणि ज्यावेळी विचारात घेतल्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद वाटतो 

परंतु, अलीकडे विशेष आनंदाची बाब म्हणजे तरुण कलाकार मग तो अभिनेता असो की अभिनेत्री असो हे वेगळे विषय घेऊन धाडस करीत आहेत वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत अनेक तरुण दिग्दर्शक राजकुमार हिरानी,राम गोपाल वर्मा, राजकुमार संतोषी ,अमर कौशिक हे सर्व दिग्दर्शक एक वेगळीच कल्पना घेऊन परंतु असे चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन करीत आहेत हाच अनुभव मराठी चित्रपटात देखील आहे रवी जाधव संजय जाधव नागराज मंजुळे असे दिग्दर्शक खूप वेगळ्या प्रकारचे चित्रपट (movies) घेऊन येत आहेत.

 सचिन महेश कोठारे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तर चित्रपट (movies) गाजवले परंतु त्या पातळीच्या पुढे जाऊन कोणत्याही व्यवसायाचा समुद्र मनात न बाळगता व्यवसायिक गणिते बेफिकीरपणे उडवून लावत कलात्मक दृष्टी विकसित करणारे चित्रपट असे दिग्दर्शक बिनधास्तपणे करीत आहेत.याच महिन्यात माझे नोव्हेंबर एक 2019 मध्ये 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर गोवा राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला.

 अमिताभ बच्चन यांच्यापासून ते केंद्रीय मंत्र्यां पर्यंत सर्वांनीच मोठ्या उत्साहाने हजेरी लावली.यावेळेला तीनशे चित्रपट विविध शेकडो देशातून आलेले होते.संपूर्ण भारतात आता चित्रपटात बाबत एक विशिष्ट एकात्मता निर्माण होत आहे.प्रादेशिकता एका अर्थाने गळून पडत आहे प्रादेशिक वैशिष्ट्ये टिकवून सुद्धा चित्रपट सातासमुद्रापार तर जातच आहे परंतु तो भारतात विशेष लोकप्रिय होत आहे.

 कलात्मक दृष्टीला तरुणांकडून स्वीकारले जात आहे एखाद्या चित्रपटात किती तगडी स्टारकास्ट आहे किती मोठे स्टार आहेत हे पाहण्याचा जमाना आता इतिहासजमा झाला आहे .त्यामध्ये सुपरस्टार असेल देखणी हीरोइन असेल तर चित्रपट पाहायचा तसेच चांगली गाणी असतील तर चित्रपट पाहायचा असे दृष्टीकोन आता जुने झाले आहेत.आयुष्मान खुराना ,भूमि पेडनेकर तापसी पन्नू ,राजकुमार राव विकी कौशल असे कलाकार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यासाठी झगडत आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करून खूप आनंद मिळवत आहेत विद्या बालन कंगना राणावत अशा नायिका वेगळ्या वाटा चोखाळत आहेत.

 कंगना राणावत क्वीन तसेच फॅशन आणि तनु वेड्स मनु रिटर्न तीन चित्रपटांसाठी आत्तापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आणि 2019 मध्ये झाशीच्या राणी च्या जीवनावर आधारित मनिकरनिका या चित्रपटातूनही अत्यंत प्रभावीपणे भूमिका साकारली हे उदाहरण देण्याचे एवढेच कारण की या मुली देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत स्वतः कंगणा राणावत हिमाचल प्रदेशातून आलेली आहे .उषा जाधव महाराष्ट्रातील आहे.तिने धग चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

उपेंद्र लिमये यांनी जोगवा चित्रपटातून उत्कृष्ट भूमिका साकारून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर उमेश कुलकर्णी गिरीश कुलकर्णी हेदेखील वेगळ्या विषयांवरचे धाडस करत आहेत त्यांचे चित्रपट विहीर देऊळ वळून हे वेगळी कलात्मक उंची गाठणारे होते इतकेच नव्हे तर देऊन साठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला तर अगदी अलीकडे याच वर्षी उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटासाठी विकी कौशल या तरुण परंतु अभ्यासू आणि प्रयोगशील कलावंत याला तसेच आयुष्यमान खुराना या  अभ्यासू आणि वेगळी वाट चोखाळणाऱ्या कलाकाराला अंधाधून साठी विभागून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

मराठी इसवी सन 2000 नंतर चित्रपटांवर जरी दृष्टी टाकली तरी सहज लक्षात येते की चित्रपटाची जातकुळी आणि चित्रपटांचा बाज बदलत आहे चित्रपट अधिक समाजशील होत आहे चित्रपटातून सामाजिक चिंतन तसेच सामाजिक समस्या यांचा उहापोह केला जात आहे अगदी उदाहरणच द्यायचे म्हटले तर अक्षय कुमार हा नव्वदच्या दशकात ॲक्शन हिरो म्हणून उदयाला आला खिलाडी खिलाडियों के खिलाडी सबसे बडा खिलाडी असे अनेक चित्रपट त्यांनी केवळ रक्षणासाठी केले त्यातीलच मोहरा हा सुद्धा चित्रपट होता परंतु त्याच्या वयाच्या चाळीशीच्या आसपास आणि बदलत्या काळात त्यांनी अधिक समस्या आधारित चित्रपट करायला सुरुवात केली.

 स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संदर्भातील पॅडमॅन चित्रपट सुद्धा त्यातीलच आहे तसेच रुस्तम मिशन मंगल अशीही अनेक चित्रपट आहेत शौचालयाची गरज हा भारतातील खूप मोठा आणि कळीचा मुद्दा आहे स्वच्छ भारत अभियान आपण मोठ्या आनंदाने राबवत आहोत .त्यावरच आधारित टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपट सुद्धा त्यांनी केला.

अजय देवगन यांनीसुद्धा द लिजंड ऑफ भगतसिंग आणि जखम या दोन वेगळ्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले.त्यांनी कंपनी सरकार वेगळा चित्रपटही केला ही उदाहरणे पाहिली तर सहज जाणवते की सुरुवातीच्या तारुण्याच्या काळात ॲक्शनपट करणारे हिरो सुद्धा आता समाजाभिमुख दृष्टिकोनाकडे वळले आहेत आणि त्यांचा आदर्श म्हणून की काय आणि तरुण दिग्दर्शकांचे प्रोत्साहन आणि लेखकांची सर्जनशीलता या सर्वांचा मिलाफ होऊन आयुष्मान खुराना राजकुमार राव विकी कौशल सारखे अभिनेते तसेच तापसी पन्नू कंगणा राणावत विद्याबालन उषा जाधव भूमी पेडणेकर अशा अभिनेत्री नव्या वाटा चोखाळत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीच्या काळात ऍक्शन चित्रपटांची धमाल उडवून दिली 1973 च्या जंजीर पासून ते बडे मिया छोटे मिया च्या काळापर्यंत ही धमाल बऱ्यापैकी सुरू होती परंतु त्यानंतर अग्नीपथ ला नॅशनल अवॉर्ड मिळाली आणि ब्लॅक हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटाला ब्लॅक साठी सुद्धा अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि अगदी अलीकडच्या काळा पा  पिकु पिंक असेही चित्रपट खुप हटके चित्रपट अमिताभने केले 102 नॉट आउट हासुद्धा ऋषी कपूर बरोबर चित्रपट खूप वेगळ्या विषयावर होता यापैकी पिकु साठी ज्यामध्ये पोटाचा त्रास असलेल्या वृद्धाची भूमिका मी केली होती राष्ट्रीय पुरस्कार पुन्हा एकदा पटकावला.

त्याच्याकडून आदर्श घेऊन तरुण कलाकारांची फळी वेगळ्या विषयांवर चित्रपट करीत आहे.ही निश्चितच भूषणावह बाब आहे अमिताभबरोबर तापसी पन्नू हिने पिंक  चित्रपटात खूप सुंदर अभिनय केलामराठी चित्रपट सुद्धा याबाबतीत मागे नाहीत 2004 मध्ये श्वास चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

 त्यानंतर मराठी चित्रपटाची दिशा बदलली त्यानंतर देऊळ चित्रपटाने सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला रवी जाधव यांचे नटरंग बालक-पालक असे चित्रपट असोत किंवा संजय जाधव चे दुनियादारी अग बाई अरेच्चा असे चित्रपट असोत मराठी ही वेगळ्या चित्रपटांची लाट आली आणि अजूनही टिकून आहे येथे कोणीही व्यवसायाचा विचार करत नाही हे महत्त्वाचे आहे.

 प्रयोग इथे कलात्मकता महत्त्वाची मानली जात आहे प्रायोगिकता कलात्मकता आणि व्यावसायिकता जर एकत्र आली तर उत्तमच असाही एक प्रवाह आहे मराठीतून हिंदीमध्ये दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक हेसुद्धा एक वेगळेच प्रतिभाशाली दिग्दर्शक आहेत उदाहरणार्थ मधुर भांडारकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे आशुतोष गोवारीकर यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

 मधुर भांडारकर यांनी ट्रॅफिक सिग्नल पेज थ्री आणि चांदनी बार अशा तीन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पारितोषिक मिळवले तर आशुतोष गोवारीकर यांनी लगान चित्रपटाचे दिग्दर्शन करून थेट ऑस्करपर्यंत स्पर्धात्मक धडक मारली.इकडे शिवाजी लोटन पाटील यांनी धग सारखे चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मिळवला.हा प्रवास चालू असताना कोणतीही कला विशेषता चित्रपट (movies) नाटकासारखे कला यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट लेखन गरजेचे असते .कथा-पटकथा-संवाद बांधेसूद बंदिस्त गोळीबंद आणि विषयानुरुप असावी लागते वेगळ्या विषयाला भेटताना ही बाब लक्षात घ्यावी लागते त्या दृष्टीने विचार केला तर अलीकडचे सेक्शन 375,बाला, सुपर थर्टी तसेच नवाजुद्दीन सिद्दिकी, राजकुमार राव यांचे जवळजवळ सगळेच चित्रपट यांचे लेखन अत्यंत कसदार आहे.

अमर कौशिक सारखा नवीन दिग्दर्शक स्त्री आणि बाला दिग्दर्शित करतो तेव्हा खूप आनंद वाटतो.राम गोपाल वर्मा राजकुमार संतोषी संजय लीला भन्साळी असे दिग्दर्शक नवे प्रयोग घेऊन येतात आणि कसदार अभिनेत्याने कडून त्यांच्यातील बेस्ट अभिनय काढून घेतात.त्याचा खूप आनंद होतो .ब्लॅक मधून अमिताभला पेश करणारे संजय लीला भन्साळी यांचे योगदान मोठे आहे ऐतिहासिक चित्रपट  देवदास पद्मावत बाजीराव मस्तानी निर्माण करणे आणि दिग्दर्शित करणे शिवाय संगीतकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणे हे सोपे नाही.

 अशी चौफेर जबाबदारी संजय लीला भन्साळी यांनी बजावली आहे राम गोपाल वर्मा यांनी सत्या कंपनी सरकार दौड अशी  चित्रपट दिग्दर्शित केले आणि ते यशस्वी करून दाखवले तर राजकुमार संतोषी यांनी अंदाज अपणा अपणा, दामिनी ,घातक, घायल ,चायना गेट, लज्जा अशा चित्रपटातून छाप उमटवली.याच वेळी प्रकाश झा सारखे दिग्दर्शक देखील गंगाजल मृत्युदंड सारख्या चित्रपटा मधून प्रयत्न करीत आहेतच मराठी दिग्दर्शक बरोबरच आसामी कन्नड बंगाली दिग्दर्शकांचे योग्य योगदान मोठे आहे तो एक लेखाचा वेगळाच विषय होईल परंतु महत्वाचे हे आहे की नवीन समाजाभिमुख समस्याप्रधान आणि समाजाच्या काळजाला थेट भिडणार्‍या विषयांना दिग्दर्शक आणि कलाकार सामोरे जात आहेत ही खूप आनंदाची बाब आहे.

  • यशेंद्र क्षीरसागर

    कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu