Marathi Kavita – दोन बंद शिंपले – #369 – The Best

Marathi Kavita – दोन बंद शिंपले

बालपण भुरकन उडून गेले ।
तारुण्यात मी पदार्पण केले ।।
संसार सागरात पेतली उडी ।
सुरेल संसाराची जमली जोडी ।।
त्या संसार सागरात दोन बंद शिंपले ।
त्यांना मी फार जीवापाड जपले ।।
वाटले होते पाणीदार खरे मोती बाहेर येतील ।
जीवनात आनंद देवून जातील ।।
परंतु वेळ येताच शिंपले उकलले ।
आणि खोटे मोती बाहेर आले ।।
पाणीदार मोत्यांची केली आशा ।
परंतु पदरी आली मोठी निराशा ।।
जीवन त्यांच्या सदा पडो ही खऱ्या मोत्याची रास ।
संसारी तुम्ही सुखी असावे हीच मनी आस ।।
संसारी तुम्ही सुखी असावे हीच मनी आस ।।

Leave a Reply

Close Menu