mulanchi bhasha aani shikshak -# 1 – The Best Information

mulanchi bhasha aani shikshak – ( पुस्तकाचे नाव – मुलांची भाषा आणि शिक्षक ) महाराष्ट्र 

प्रस्तावना – भाषा ही मानवाला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. माणसाला भाषेविषयीचे प्राचीन काळापासून कुतूहल वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे. या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे ‘भाषा’ ही संज्ञा ‘बोलणे’ या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय, कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षातघेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे, संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो. थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.

सर्वसाधारण व्यवहारात ‘भाषा’ ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण नेमका कशाचा अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामळे भाषेची अधिक नेमकेपणाने व्याख्या करते. भाषेचे स्वरूप नेमकेपणाने उलगडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यादृष्टीनें पाहता, केवळ ‘बोलणे’ म्हणजे भाषा नव्हे, तर भाषा ही गोष्ट त्यापलिकडची, अधिक व्यापक अशी आहे, असे आज अभ्यासक मानतात. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत. मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे ‘भाषा’होय.

वरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठरावीक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे, तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे आळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो. याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषने विकसित केले असे म्हणता येईल. तसेच रेडिओ किंवा दुरदर्शनचा संच बाहेरून बघितला तर खूपच सुबक आणि आकर्षक तारांच्या दिसतो. पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळ्या खुपच गुंतागुंतीच्या रचना केलेल्या आहेत असे दिसते. भाषेचे स्वरूप असेच गंतागंतीचे असते. प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे ती खुप सोपी आहे असे वाटत असते. पण कोणत्याही भाषेचे स्वरूप आपण समजावून घ्यायला लागलो की तिच्यात दूरदर्शन संचाप्रमाणे खूपच गुंतागुंतीच्या रचना आहेत असे लक्षात येते.

भाषेचा वारसा माणसाला त्यांच्या समाजाकडून मिळतो. भाषा संदेश-वहनाची, व्यवहाराची व विचार विनिमयाचे अत्यंत सुलभ असे साधन आहे. आपले व्यवहार सुलभ व्हावे यासाठी भाषाप्रभुत्व संपादन करण्य गरज आहे. हे प्रभुत्व प्रयत्नपूर्वक हळूहळू संपादन करता येते. एका अर्थाने भाषिक कौशल्य पायरी पायरीने व्यक्तीच्या ठिकाणी विकसित होतात.अनुभव संपन्न होत जातात तसतशी अभिव्यक्तीची कौशल्ये विकसित होत जातात, सर्वांगीण विकास होतो. मानव हा समाजशील व समाजप्रिय प्राणी आहे असे म्हटले जाते. कळपाने, थव्याने राहणारे कीटक पशुपक्षी आपल्याला परिसरात आढळतात. माझी गरज हे त्यांच्या गट प्रवृत्तीचे प्रमुख कारण होय. राहण्यामागे माणसांच्या बाबतीत ही आरंभी हीच सुरक्षिततेची भावना असावी पण सांस्कृतिक विकासाबरोबरच माणसाच्या बाबतीत प्रेम, वात्सल्य, स्नेह या नाजूक भावनांचाही विकास झाला. डोळ्यांचा आविष्कार भाषेद्वारा करता आल्याने मानवी समाज जीवनाला अर्थ आल्याचे दिसून येते. ही समाजशीलता भाषेने टिकवून ठेवली असे म्हणता येईल. समाजाच्या व्यक्तिशः मानवाच्या अस्तित्वाला व विकासाला भाषा कशी कारणीभूत ठरते याचे वर्णन डॉ जॉन ड्यूई यांनी पुढील प्रमाणे केले आहे. “भाषेच्या जोरावर आपण गत काळातील मानवी अनुभवात सहभागी होऊ शकतो आणि वर्तमान कालीन अनुभवाच्या कक्षा विस्तृत करून त्याला समृद्ध बनवू शकतो. त्यांच्या प्रतीकांच्या साह्याने पुढील घटनांची अटकळ आपणास बांधता येते. फलश्रुती आणि सामाजिक दृष्टीकोन यांची नोंद करता येते, असे सूत्ररुपाने जतन करून ठेवण्याच्या भाषेत अनेक पद्धती असतात. जी मूल्यवान व महत्वपूर्ण आहे. त्यात भाषेला एवढा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे की त्यामुळे निरक्षर व अशिक्षित हे शब्द जवळजवळ समानार्थक झाले आहेत. बालकाच्या जीवनात भाषा शिक्षणास महत्त्वपूर्ण स्थान आहे. बालक शाळेत शिकवले जाणारे सर्व विषय भाषेच्या माध्यमातून आत्मसात करीत असते. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन लेखन ही भाषा विकासाची चार कौशल्य बालकांच्या अंगी उत्तम विकसित होणे आवश्यक असते. ही कौशल्ये विकसित करण्यासाठी त्याच्या पूर्व अनुभवाच्या आधारे सुनियोजित अनुभव व सराव देण्याची गरज असते. म्हणजे कौशल्याचा विकास होय, भाषा विकासाचे पाठ्यपुस्तक प्रभावी साधन आहे. पाठ्यपुस्तक हे अनेक साधनांपैकी सहज उपलब्ध होणारे एक साधन आहे. मुलाचे घराच्या तसेच शाळेच्या परिसरात सर्व घटकांची एकत्रित मांडणी व आशय म्हणजे पाठ्यपुस्तक होय. भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील विविधता व वैशिष्ट्ये यांचा परिचय व्हावा, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, वाढण्याची आवड निर्माण व्हावी, त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न व्हावे, मुलांच्या मनात प्रेम निर्माण व्हावे, पाहाण्याची निकोप दृष्टी तयार व्हावी आणि त्याच्यावर नैतिक मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जाते.

शालेय शिक्षणात विद्यार्थी सर्वांगोण विकासामध्ये भाषेचे महत्व अनन्य साधारण आहे. शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन अध्यापन व मूल्यमापनात व एकूणच विचार प्रक्रियेत भाषा महत्वाची आहे. प्रत्येक शिक्षकाला भाषा अध्ययन व अध्यापनाची सखोल माहिती असायला हवी. विद्यार्थी विकासात सहाय्य करणाऱ्या व उपयोगी ठरणान्या पुस्तकांचे परीक्षण करून त्याची माहिती शैक्षणिक उपक्रम, संमेलन व शिक्षण परिषदेमधून दिल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये मदत होते. म्हणूनच सध्या विविध शिक्षण परिषदांमधून पुस्तक परीक्षण वर चर्चा घडवून आणली जात आहे. विविध शैक्षणिक प्रयोग यशस्वी केलेल्या लेखकांची पुस्तके ही शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात.विचारवंत, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना ही पुस्तके नेहमीच उपयोगी ठरलेली आहे, आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक केंद्रामधून शिक्षण परिषदांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पुस्तक परीक्षण हा महत्वाचा विषय घेण्यात आलेला आहे. पुस्तक परीक्षणासाठी मुलांची भाषा आणि शिक्षक हे पुस्तक देखील निवडण्यात आलेले आहे. या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती प्रस्तुत लेखात देण्याचा प्रयत्न केलेला आहे,

पुस्तकाचे नाव – मुलांची भाषा आणि शिक्षक

लेखकाचे नाव – कृष्णकुमार

 मराठी अनुवाद – वर्षा सहस्त्रबुद्धे

लेखकाचा परिचय – National Book Trust , India यांनी 2004 मध्ये The Child’s Language and The Teacher

हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे लेखक शिक्षण क्षेत्रात भाषा विषय व अध्यापन या विषयावर अत्यंत प्रभावी कार्य करणारे श्री कृष्णकुमार आहेत. या पुस्तकामध्ये बालकाचे शिक्षण व शिकण्याची भाषा यावर सखोल माहिती देण्यात आलेली आहे. मुळ पुस्तक हे इंग्रजी भाषेत असून श्रीमती वर्षा सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकाचे मराठी रुपांतर केलेले आहे. शिक्षणामध्ये व विशेषत: बालकाच्या भाषा शिक्षणाविषयी व शिक्षकाविषयी कृष्णकुमार यांनी विविध प्रयोग केलेले आहे. 1985 मध्ये मध्य प्रदेशातील टिकमगड येथील बाल साहित्य केंद्रामध्ये या पुस्तकातील कृति प्रत्यक्ष बघितल्या आहेत. भल्या सकाळी साडेसहा वाजता विद्यार्थी केंद्रात येत असत व कृतीमध्ये सहभागी होत असत. या केंद्रातील विद्यार्थ्यांच्याभाषा शिकण्यातील प्रगतीचा आलेख पाहून श्री कृष्णकुमार यांनी या सर्व कृतींची एकत्रित अशी शिक्षक हस्तपुस्तिका तयार केली. या हस्तपुस्तीकेचेच नाव The Child’s Language and The Teacher Handbook असे आहे. या शिक्षकासाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिकेचा वापर मध्यप्रदेश राज्यात प्रचंड यशस्वी झाला. पुढे युनिसेफ, इंडिया यांनी या हस्तपुस्तिकेची दखल घेतली व देशातील शिक्षकांना उपयोगी ठरेल यासाठी या ही हस्तपुस्तिका प्रकाशित केली. प्रस्तावना – मुलांची भाषा आणि शिक्षक या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकाने मुलांच्या विकासामध्ये भाषा शिक्षणाचे महत्व सांगितले आहे. विज्ञान, आरोग्य व पर्यावरण या विषयासाठी अभिनव शिक्षण पद्धती शोधणान्या अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत. भाषा शिक्षणाचा अभ्यास या विषयाचा विचार केल्यास पाहिजे तेवढ्या संस्था दिसून येत नाही.त्यामुळे याविषयावर पाहिजे तेवढे बोलले जात नाही. मुलांच्या सर्वांगोण विकासमध्ये, बाल संगोपनामध्ये, कृतीयुक्त अध्यापनामध्ये भाषेचे स्थान महत्वाचे ठरते. अभ्यासक्रम , पाठ्यपुस्तके , शिक्षक प्रशिक्षण व अध्यापन पध्दती या सर्वांमध्ये भाषा शिक्षणाचा सहभाग असायला हवा. बालवाडी अंगणवाडी व प्राथमिक शाळा मधून प्रस्तुत पुस्तकातील कृती घेण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी प्रस्तावनेमध्ये केलेले आहे. अनुक्रमणिका – अनुक्रमणिकेमध्ये 1. भाषा म्हणजे काय ?, 2. बोलणे, 3. वाचणे, 4. लिहिणे, 5. पाठ्यपुस्तके परीक्षा आणि अवकाश अशा पाच घटकांचा समावेश केलेला आहे. पुस्तकामध्ये एकूण पृष्ठ संख्या 43 इतकी आहे. प्रस्तुत पुस्तक परीक्षणामध्ये या पाच घटकावर थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. ती पुढील प्रमाणे

1. भाषा म्हणजे काय? (mulanchi bhasha aani shikshak)

भाषा हे संवादाचे साधन आहे अशी व्याख्या करणे आपल्यापैकी बहुतेकांच्या इतके अंगवळणी पडले हे की विचार करणे, संवेदना किंवा जाणीव होणे आणि प्रतिसाद देणे या सर्वांचे साधन देखील भाषा आहे हे आपण विसरतो. बालकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वरील सर्व बाबी महत्वाच्या ठरतात. बालकाच्या व्यक्तीमत्वाला भाषेमुळे आकार येत असतो. मुलाची जगाकडे बघण्याची दृष्टी, रुची, क्षमता, मूल्ये आणि वृत्ती अशा अनेक गोष्टींना भाषा सूक्ष्मपणे तरीही प्रचंड ताकदीने आकार देत असते. शाळेमधील एक विषय म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयाकडे बघितले जाते. त्याचबरोबर पहिली भाषा. दसरी भाषा, तिसरी भाषा अशा प्रकारे भाषा शिक्षणाचे क्रम लावले जातात. यानुसारच मग भाषेचे नियम , तिच्या रचना वा शब्दसंग्रह यावर विचार केला जातो. पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रमामध्ये आशयाबरोबरच इतर उपयोगी माहिती , संदर्भ असावे असे शिक्षकास वाटते. अशावेळी शिक्षकांना भाषा शिक्षणात नेमकेपणा येण्यासाठी व याविषयी उहापोह करण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. मुले हातांनी , शरीराचा वापर करून काही ना काही कृति करत असतात. वस्तूंशी त्यांचा संपर्क येतो याचा आणि मुळे भाषा कशी वापरतात याचा फार घनिष्ट संबंध आहे. बाल्यावस्थेत असतांना शब्द आणि कृति हातात हात घालून येतात. कृति आणि अनुभव संपून गेल्यानंतरही त्यांच्यापर्यंत पोचण्याची वाट शब्द निर्माण करतात. मुलांचा ज्या वस्तूशी संपर्क येतो त्या वस्तूबरोबरचे मुलांचे नाते शब्दामुळे अधिक समृध्द होते. कृतीविरहित शब्द , वस्तूशी संबंध न येता मिळालेले शब्द मुलांच्या दृष्टीने पोकळ आणि अचेतन ठरतात.

म्हणूनच मुलांना वस्तुंचा प्रत्यक्ष अनुभव देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकावर असते.

मुलांचीच भाषा वापरून खालील उपक्रम घेता येतात.

1. स्वत:च्याच कृतींना दिशा देणे.

2. इतरांचे लक्ष वेधणे व त्यांच्या कडून कृती करून घेणे.

3. गोष्टी तयार करणे.

4. जीवनाची प्रतिनिधिक मांडणी करणे.

5. एकरूप होणे

6. अंदाज बांधणे.

7. माहिती घेणे.

8. कारण शोधणे

9. कृतीयुक्त गाणी व बडबडगीते.

वरील कृति बरोबरच प्रासंगिक उपक्रमाचे आयोजन शिक्षकांनी करायला हवे.

2. बोलणे (mulanchi bhasha aani shikshak)

बोलणे ही चांगली गोष्ट नाही अशा नकारात्मक दृष्टीने आपल्याकडच्या शाळामध्ये बोलण्याकडे बघितले जाते. कुणी बोलत असेल तर शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या बाबीकडे तो दुर्लक्ष करीत आहे असे गृहीत धरले जाते त्यामुळे मुले बोलत आहे असे दिसले तर शिक्षकाला त्यांना गप्प करावेसे वाटते. शिकण्याच्या प्रक्रियेत बोलण्याचे असंख्य उपयोग आहेत. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळातील मुलांच्या वयात बोलणे हे शिक्षणाचे प्रमुख साधन असते.शिकलेल्या गोष्टी बोलण्यातून स्थिर, पक्क्या होतात. जिथे लहान मुलांना मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही त्या शाळांमधून विद्यार्थी विकासाला मर्यादा येतात. मुले अनेक कारणांनी बोलतात. त्यापैकी प्रत्येक प्रकारचे बोलणे हे शिक्षकासाठी उपयोगी ठरणारे असते. आशय दृढीकरणासाठी बोलण्याचा वापर खुबीने करता येतो. शिक्षकाला मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवयच असायला हवी. साधी वाटली तरी ही अवघड गोष्ट आहे. कारण मुलांनी काय करायचे , काय नाही हे सांगण्याचे काम आपण मोठे म्हणून आपले आणि ऐकण्याचे काम मुलांचे असे आपल्याला वाटते. मुले बोलतात तेंव्हा चांगला श्रोता होणे आवश्यक आहे. कोणत्या कारणासाठी बोलले जात आहे आणि त्यामुळे शिकण्याच्या कोणत्या संधी निर्माण होत आहेत हे हेरणारा श्रोता उत्तम शिक्षक असतो. मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय जडली की बोलण्याच्या या आणि इतर कार्यामधला फरक लक्षात येतो, विश्लेषण व कारणमीमांसा यासारख्या कौशल्याचा विकास होतो. मुलांच्या बोलण्याचा वर्गातील साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा असेल तर बोलण्यासाठी पोषक असे वातावरण शिक्षकाने तयार करायला हवे. आपल्या वागण्यामधून आणि मुलांच्या बोलण्याला प्रतिसाद देण्यामधून, मुलांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे हे शिक्षकाने मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मुलांची बोलण्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाच प्रकारच्या संधी शिक्षक वर्गात निर्माण करू शकतो. त्याखालीलप्रमाणे

1. स्वत: विषयी बोलण्याची संधी.

2. शाळेतील वस्तू/ प्रसंग याविषयी बोलण्याची संधी.

3.चित्रा विषयी बोलणे.

4. गोष्टी ऐकणे आणि त्याविषयी बोलणे./ Story Bank

5. अभिनयातून सादरीकरण करणे.

वरील पाच प्रकारच्या संधी निर्माण करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका पूरक ठरते.

3. वाचन (mulanchi bhasha aani shikshak)

मुलांना वाचते करणे अतिशय कठीण आणि तितकेच रोमांचक आहे. कठीण आहे. कारण बोधाच्या पातळीवर अनेक क्षमता आणि इतरही अनेक कौशल्ये यांची सांगड घालणे वाचन क्षमतेमध्ये अंतर्भूत आहे. वाचायला कसे शिकवायचे याची एकाच एक सर्व समावेशक अशी पध्दती नाही. प्रत्येक पद्धतीच्या काही ना काही मर्यादा आहेत. वाचायला शिकणे ही हरखून टाकणारी गोष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे वाचते होण्यावर मुलांच्या जीवनातले खूप काही अवलंबून असते. एकदा का मुलांची वाचन आणि पुस्तके यांच्याशी ओळख झाली की, मुल काय काय करेल, काय काय करु शकेल याबाबतच्या शक्यता खुपच वाढतात, ज्याच्याद्वारे मुलं लिखीत किंवा छापील भाषेशी अर्थाची सांगड घालू शकेल अशी कौशल्ये म्हणजे निकोप वाचन कौशल्ये, वाचन केलेल्या मजकुराचा अर्थ जोपर्यंत मुलं लाऊ शकत नाही तोपर्यंत त्याचे वाचन निकोप आहे असे म्हणता येत नाही. वाचन शिकण्याची सुरुवात अर्थपूर्ण कशी होईल ? हा आपल्या पुढील कळीचा प्रश्न आहे. यासाठी शिक्षक करू शकतील असे काही उपक्रम , काही कृति पढे दिलेल्या आहेत. काही वेळा या गोष्टी अशक्य वाटतील पण तरीही याच कृतीमधून वेगाने भाषा विकास साधला जाणार आहे. आपल्याला अशाच नव्या पध्दतीची गरज आहे. फक्त नव्या पध्दतीच नव्हे संपूर्णपणे नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. या नवीन पद्धती पुढील प्रमाणे

1. पुस्तकांनीच सुरुवात.

2. मुलांना पुस्तक वाचून दाखविणे.

3. कविता म्हणणे.

4. पुस्तके बनविणे आणि ती वाचणे.

5. अर्थ आणि उच्चार.

6. जमिनीचा / भिंतीचा उपयोग करून अध्यापन.

7. मुळाक्षरांची विभागणी, विज्ञान वाचन, शब्दाचे ठिकरी पाणी,वाचून कृति करणे, आधीचा शब्द , नंतरचा शब्द , गट

करणे , तीन प्रश्न , कवितांची सरमिसळ ,

8. प्रतिसाद देणे

9. कविता करणे/लेखन करणे.

10.गोष्ट तयार करणे./ लेखन करणे.

या बरोबरच शिक्षकाने प्रसंगानुसार व विद्यार्थी आवडीनुसार वाचन विकासाचे विविध उपक्रम व कृतीचे आयोजन करावे.

4. लिहिणे (mulanchi bhasha aani shikshak)

लिहिणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच. आपण जेंव्हा लिहितो तेंव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष नसलेल्या अशा कोणाशीतरी आपण संवाद साधात असतो, कधी कधी आपण एखादी माहिती जतन करून ठेवण्यासाठी लेखन करतो. कधो एखादी आठवण , कधी एखादी कल्पना याविषयावर केलेले लेखन म्हणजे स्वत:शीच केलेले बोलणे होय. लहान मुलांना लिहिणे शिकवितांना बोलण्याचे एक रूप म्हणूनच आपण शिकवायला हवे. लिहिणे ही कोणाला तरी उद्देशून केलेली कृति आहे ही दृष्टी मुलांना निश्चित मिळेल हे पाहणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. काही वेळा शिक्षकाच्या सांगण्यावरून यांत्रिकपणे पुन्हा पुन्हा करण्याची कृति म्हणजे लेखन अशी विद्याथ्यांची भावना होते. काहीतरी व्यक्त करण्यासाठी लेखन करावयाचे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. लिहिणे हे बोलण्याचेच पुढचे, निराळे रूप आहे हे रुजविण्याची दक्षता शिक्षकाने घ्यायला हवी.

लेखन विकासासाठी घ्यावयाचे उपक्रम व कृति

1. बोलणे आणि लिहिणे.

2. लिहिणे आणि बोलणे, माहिती देणे.

3. परिचित वस्तू दाखविणे व वस्तूचे नाव लिहिणे.

4. शब्द / वाक्य लेखन संग्रह करणे.

5. शब्द पूर्ण करणे.

6. मुलांचे गट करणे व शब्द भेंड्या खेळ घेणे,

7. नकाशा रेखाटन

8. चित्राविषयी लेखन करणे,

9. कविता करणे/ लेखन करणे.

10. गोष्ट तयार करणे / लेखन करणे,

या बरोबरच शिक्षकाने प्रसंगानुसार व विद्यार्थी आवडीनुसार वाचन विकासाचे विविध उपक्रम व कृतीचे आयोजन करावे.

5. पाठ्यपुस्तके परीक्षा आणि अवकाश (mulanchi bhasha aani shikshak)

आपल्या देशातल्या सर्व शिक्षकांना पाठ्यपुस्तक शिकवून संपवावे लागते. शिक्षकाला पाठ्यपुस्तकातला एक एक करीत सर्व धडे शिकवावे लागतात. त्या त्या धड्यावरील गृहपाठ द्यावा लागतो. त्याखालचे गृहपाठ द्यावे लागतात. स्वाध्याय सोडवून घ्यावे लागतात. आणि धड्यातील आशयावर मुलांनी प्रभुत्व मिळविले की नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. अशा परिस्थितीत आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, जगातील कोणतेही पाठ्यपुस्तक घेतले तरी मुलांचे शाळेतील जीवन आनंदाचे आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी जे आवश्यक असते ते सगळे काही त्या पुस्तकात असणे शक्य नाही उत्तम पाठ्यपुस्तकात चांगल्या आशयाचे काही नमुने असतात. बाकीची भिस्त शिक्षकांच्या कल्पकतेवर आणि कष्टावरच अवलंबून असते. भाषेचा शिक्षक हा मुलांना नवीन असे काही देत नसतो तर आधीपासूनच जे माध्यम मुले हाताळत आहेत त्यावर अधिक प्रभुत्व मिळविण्यासाठी मदत करणार असतो. विविध प्रसंग निर्माण करून शिक्षक अशी मदत करु शकतो. कोणतेही पुस्तक हे अध्ययन अध्यापनाचे एक साधन असते. भाषा वापरण्याची मुलांची क्षमता वाढविणे हे शिक्षकाचे खरे उद्दिष्ट असते केवळ पाठ्यपुस्तकातील धडे उरकणे हे नव्हे. परीक्षा – सध्याच्या परीक्षा पध्दतीत मुलांच्या श्रवण क्षमतेकडे आणि संभाषण क्षमतेकडे दुर्लक्ष होते. मात मांडणे , वर्णन करून सांगणे यासारख्या क्षमतांना परीक्षेमध्ये जागा नसते. एकेकाळी तोंडी परीक्षा हा शालेय अभ्यासक्रमातील महत्वाचा मुलभूत भाग असे, पण सध्या तोंडी परीक्षेवर मर्यादा आल्या आहेत. श्रवण व संभाषण क्षमतावर मूल्यमापन पद्धतीचा समावेश करायला हवा.मुलांचे निरीक्षण कसे करावे ? त्यांच्या नोंदी कशा कराव्यात याचे शिक्षकांना प्रशिक्षण मिळायला हवे.

परीक्षणाचा सारांश – (mulanchi bhasha aani shikshak)

भाषा शिक्षणाची /अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत

लक्षपूर्वक श्रवण करणे व त्याचे आकलन करणे , आपले विचार भावना कल्पना इच्छा स्पष्ट व योग्य शब्दात व्यक्त करणे, मनोगत वाचन करणे व त्याचे आकलन करणे, स्वच्छ वळणदार अक्षरात लेखन करणे, विरामचिन्हांचा वापर वनीटनेटके लेखन करणे, वृत्तपत्रे, नियतकालिके, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या माध्यमातून भाषिक अनुभव

विकसित करणे. दैनंदिन व्यवहारात भाषेचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो, विद्यार्थ्यांना भाषा समजणे व त्या भाषेचा व्यवहारात वापर करता येणे ही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कौशल्याच्या प्राप्तीसाठी ग्रहणशक्ती आवश्यक असते. श्रवण व वाचन या दोन भाषिक कौशल्याबरोबर ग्रहणशक्ती प्राप्त करता येते. आपले विचार, भावना, अनुभव यांचा व्यवहारात वापर करणे हे भाषण व लेखन या कौशल्याचे उपयोगी पडते, त्यासाठी भाषण व लेखन या चारही कौशल्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. श्रवण कौशल्य – श्रवण म्हणजे ऐकणे. कोणतेही आवाज आपण कानामार्फत ऐकत असतो. हे ऐकलेले आवाज मेंदूकडे पोहोचविले जातात. तेथे त्यांचा परस्परसंबंध लावला जातो. त्यातून अर्थ निर्माण होतो. विविध प्रकारचे ध्वनी ऐकून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी मुलांना सरावाची आवश्यकता असते. त्यासाठी कानांना लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावणे महत्त्वाचे असते. मुले अनुकरण करून उच्चार करण्याचा प्रयत्न करीत असतात अशा वेळी त्यांच्या कानावर शुद्ध, स्पष्ट, अचूक उच्चार पडण्याची नितांत गरज असते तसेच सावधानपूर्वक श्रवण करणे महत्वाचे असते.

भाषण कौशल्य – भाषण म्हणजे बोलणे. भाषिक कौशल्याची दुसरी पायरी म्हणजे भाषण, बोलण्यातूनच व्यक्तीचे विचार भाव, इच्छा, विचार व मागणी इत्यादींची अभिव्यक्ती होत असते. केलेल्या ज्ञानाची अभिव्यक्ती होत असते. बोलता येणे ही जीवनाची नितांत गरज आहे. भाषण कौशल्य हे अधिक महत्त्वाचे व मूलभूत कौशल्य आहे. व्यक्तिमत्त्वाच्या विकासात भाषण क्षमतेचा विकास अत्यंत मोलाचा व महत्त्वपूर्ण असतो. भावना, आपल्या मनातील आशय दुसन्याला व्यवस्थितपणे समजावून सांगणे, पटवून देणे व्यक्तीला जमले पाहिजे. दैनंदिन जीवनातील एखादा प्रसंग, एखादी घटना व अनुभव यथार्थ स्वरूपात वर्णन करून सांगणे, आपला अनुभव कलात्मक पद्धतीने सादर करणे या कला सर्वांना साध्य होणे आवश्यक असते. यासाठी भाषण कौशल्याचा विकास योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.

वाचन कौशल्य – भाषा शिक्षणातील तिसरे कौशल्य म्हणजे भाषण कौशल्य होय. जेव्हा अर्थपूर्ण उच्चारण होते, योग्यत-हेने वाचन होते, वाचण्यासाठी उच्चार त्यांची लिपी चिन्ह म्हणजेच अक्षर समजून घेणे आवश्यक असते.

विद्यार्थ्यांना वाचनाची योग्य सवय लागावी, योग्य ठिकाणी स्वरात अभिव्यक्ती यांच्यासह अस्खलितपणे वाचन करता येणे तसेच योग्यरीतीने मूक वाचन करता येणे, जे वाचले त्याचे आकलन करता येणे आवश्यक असते. वाचन ज्ञान प्राप्तीचेसाधन आहे. त्यायोगे भाषेवर प्रभुत्व मिळवता येते. विद्यार्थ्याला यथोचित पणे वाचता यावे.

लेखन कौशल्य – विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता लेखनाला अधिक महत्त्व आहे. लेखन आत्माविष्काराचे साधन आहे. लेखनाला स्थळ, काळाचे बंधन नसते. आपल्या भावना व विचार दूरवर असलेल्याला किंवा पुढच्या पिढ्यांना कळविण्याचे सामर्थ्य लेखनात असते, जीवनात भाषण संभाषणाला जसे महत्त्व आहे तसे लेखन ही मोलाचे असते. लेखन कला प्रयत्नांनी आत्मसात करता येते. त्यासाठी लिपीचा सुयोग्य वापर करता आला पाहिजे. आशय विरहित लेखन असू शकत नाही. त्यात कोणतातरी विचार, अर्थ, भावना सामाविष्ट असतेच. याबरोबर लेखनात सुसंगती मुद्देसूदपणे सुस्पष्टता असणे आवश्यक असते.

अशाप्रकारे पाठ्यपुस्तके व परीक्षा याबाबत आपले विचार श्री कृष्णकुमार यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे, स्वयंशासन, सहशिक्षण, खेळ, नाट्य, नृत्य आणि संगीत, मैदानी आणि इतर खेळ, मुलांचे संगोपन, प्रेम आणि सनगोपन,पालकांच्या समस्या, बालकांचे मानसशास्त्र अशा विविध विषयावर या पुस्तकामध्ये सविस्तर व उपयोगी असे लेखन करण्यात आलेले आहे. या पुस्तकाच्या वाचनामधून मुख्याध्यापक व शिक्षकांना निश्चित असा फायदा होणार आहे.
त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक एकदा जरूर अभ्यासावे.

पुस्तक परीक्षण सारांश – (mulanchi bhasha aani shikshak)

असिफ शेख

Homesearch google

Leave a Reply

Close Menu