mahatma gandhi essay hindi – महात्मा गांधी निबंध – #1 – The Best Essay

mahatma gandhi essay hindi – महात्मा गांधी निबंध – महात्मा गांधी के लिये एक सामान्य नागरिक का पत्र, यह मराठी भाषा मै essay है| लेकीन आप इसको translate कर सकते है |

mahatma gandhi essay hindi

प्रिय बापू,

प्रेमपूर्वक सादर प्रणाम,

 आपणास हे पत्र लिहीत असताना अनेक भावतरंग मनात उचंबळून आले आहेत. खरे तर हे पत्र नव्हेच हा आहे, एका जिवलग, विश्वहितेशी महात्म्याशी केलेला संवाद! बापू, तुमचे जीवन हाच एक संदेश आहे, असे आपण म्हणायला. ते शब्दशः खरे आहे. बापूजी (mahatma gandhi) तुम्हाला कोणी महात्मा संबोधलेले आवडणार नाही, याची मला कल्पना आहे. या संबोधन पलीकडे जाऊन मानवी जीवनाला परमात्म्याची जोडणारी तुमची विचारधारा आहे. तुमचे पारदर्शी जीवन व्रत हाच प्रेरणेचा अखंड अविरत प्रेरणा स्त्रोत्र आहे. झरा आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हेच असिधारा व्रत तुम्ही अखंड अंगिकारले. साधेपणा आणि साधनशुचिता या अजरामर मुल्यांनी तुमचे जीवन तेजाळून निघाले. सत्य आणि अहिंसा ही विचार तुमच्या जीवनाच्या विचार रुपी गाभाऱ्यात सतत तेवत राहिली. अत्यंत साध्या फकीर माणसाचीही हृदयात एक कणखर तुफान असते, जे अन्यायाचे बुरुज ढासळवण्यासाठी प्रचंड समर्थ असते. हा विश्वास जागवणारी तुमची अमर विचार प्रणाली मनात लख्खं प्रेरणेची दामिनी जागृत करते.

दुसर्‍याचे दुःख समजून घेणारा किंबहुना ते जगणारा माणूसच खरा ईश्वरपुत्र होय, ही तुमची जीवनधारणा मला मानवतेच्या गावाला घेऊन जाते. त्या पवित्र गावातून मग मला माघारी कसे फिरू वाटेल? बापूजी (mahatma gandhi) केवळ आनंदाला नव्हे, तर अश्रूंनाही गहन अर्थ असतो. दुसऱ्याचे अश्रू आपल्या पापणीतून ओघळावेत इतके दुःखदालय तुम्हाला अपेक्षित आहे. शरीर हे तर केवळ जिवंत राहण्याचे साधन! मनाचे सेतू बांधून मानवी जीवनाची समरसता अनुभवायला पाहिजे, हा तुमचा सुंदर विचार समरसून जगण्याची प्रेरणा देतो. तुमची संत राजकारणी म्हणून ओळख अवघ्या विश्वाला वंदनीय आहे. मी महात्मा नाही रे’ तू सामान्य नाहीस रे, आपण दोघेही भारत मातेची लेकरे आहोत असा जणू तुम्ही विश्वास प्रधान करता.


बापुजी, रस्त्याकडेला, रखरखीत उन्हात फाटक्या पदराची साडी ल्यालेली भगिनी, बाळाला झोळीत टाकून खडी फोडत असते तेव्हा तिच्या कष्टाळू कारुण्य डोळ्यात मला तुमची प्रसन्न आश्वासक छबी दिसते. तेव्हा जणू तुम्ही सांगत असता कष्ट हेच जीवन दुःखी पिडीत, लाचार जनतेकडे स्नेहादंतेने पहा. मग बघा तुम्हाला जीवनाचा अर्थ गवसेल. भौतिक प्रगती हे एक मृगजळ आहे. आत्मिक सुख हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. एवढे सांगून तुम्ही थांबत नाही तर गरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी स्वतःच्या परीने करण्याची तुम्ही अशी प्रेरणा देता. हीच मानव जातीची शिदोरी. सुरुवातीला लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी भांडतील आणि तुमचा विजय होईल.

तुमचे विचार दीपस्तंभासारखे भासतात. दिखाऊपणाच्या आणि चंगळवादाच्या भोवऱ्यात जीव गुदमरू लागला. की तुमचे विचार या भोवऱ्यातून बोटाला धरून अलगद बाहेर काढतात आणि जणू पाठीवर हात टाकून आश्वासित करत म्हणतात, जीवन सुंदर आहे फक्त दृष्टी पवित्र ठेव परमेश्वराला अर्पण कर, स्वच्छ मनाने जगत रहा, कृतार्थ होशील. बापुजी आज स्वातंत्र्याच्या सत्तरी मध्ये प्रत्येक जण केवळ धावतोय अर्थ मिळवण्यासाठी, अर्थहीन धडपड चालू आहे. भौतिक वादाच्या पिंजऱ्यात अडकत जाणारा समाज तुमच्या विचारांमुळे जागृत होतो. बापूजी (mahatma gandhi) तुम्हाला जेव्हा कोणासाठी काही करावेसे वाटते, मग ते वस्तूदान असो की, आता ज्ञानदान असो, तेव्हा आम्हाला तुमचे विचार प्रेरित करतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी निर्भय होतो. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते. दुसऱ्या कडून अपेक्षित असणारा बदल अगोदर स्वतःमध्ये करा. हा तुमचा विचार आत्मशुद्धी ला प्रेरित करतो.

स्वतःच्या आचरणात सद्विचार आले, तरच आपणास दुसऱ्यास उपदेश करण्याचा नैतिक अधिकार आहे, हा तुमच्या जीवन विचार आम्हाला साधनसूचीतेच्या या मार्गावर अलगत आणून सोडतो. बापूजी (mahatma gandhi) असहकार आंदोलन असो की, सविनय कायदेभंग, तुमची प्रत्येक कृती मानवतेच्या विशालम चौकटीने अंकितच होती सत्य, संयम, अहिंसा तुमचा आशयगर्भ संदेश आम्हाला प्रेरित करतो. अत्यंत विपरीत परिस्थितीत मूलभूत तत्त्वांना तिलांजली देऊ नये, मानवी मूल्यांची कायम पूजाच बांधावी. ‘मरायला तयार आहे’ मात्र कोणतेही कारण असू शकत नाही, त्याच्यासाठी मी कोणाला मारायला तयार आहे. हे तुमचे वचन तुमच्या सत्याग्रहाच्या विचारांना उजळून टाकते. बापूजी (mahatma gandhi) तुमचे अवघे जीवनच एक संघर्ष आहे, एक संग्राम आहे. मात्र ते युद्धपिपासू अथवा यशलोलप नाही. जणू तुम्ही कोण्या या माणसांशी लढला नाही, तर त्यांच्या तत्कालीन चुकीचे, मानवता विरोधी वृत्तीशी लढला. म्हणूनच तुम्ही कधीच कोणाचे दुष्मन वाटत नाही तर संतच वाटता.

एखाद्या देशात जनावरांशी कसा व्यवहार केला जातो त्यावरून त्या देशाचे महानता, नैतिकता मोजली जाऊ शकते. हा तुमचा विचार आम्हाला खूप प्रेरित करतो कारण अत्युच्च मानवतावादाचा हा अविष्कार आहे. विरोधाला प्रेमाने जिंका हे तुमचे साधे तत्त्व आहे. अहंकार. गर्व, मत्सर, यांचा त्याग करायला शिकवणारी तुमचे जीवन संकटाचा सामना कसा करावा हे शिकवणारा जणू वस्तुपाठ आहे. ‘हे विश्वची माझे घर’ हा व्यापक विचारच मनाला शांती देतो.

बापुजी तुमच्याशी संवाद साधणे म्हणजे स्वतःच्याच अंतरात्म्याशी हितगुज करण्याप्रमाणे आहे. तुमचे खासगी जीवन असो, राजकीय जीवन असो की, सामाजिक जीवन असो आम्हाला आत्मिक आनंद देऊन जाते. माणूस म्हणून स्वतःला ओळखून जीवनाशी निखळ अनुभूती देणारे तुमचे जीवन व विचार सतत सोबत असतात. हे अद्वेत अद्भुत आहे. ईश्वराशी जोडणारे आहे. जीवनाची सुरुवात प्रेम आहे, ध्येय प्रेम आहे आणि अंतही प्रेम. सत्य, अहिंसा, मानवतावाद ही प्रेमाच्या वाटेवर ची फुले आहेत, जी जीवनपथला सुगंधित करतात. जीवन खरे तर वरवर भासते रणांगण, मात्र ती मानवतेची छान बाग आहे. काटे टोचतील अवश्य! मात्र वर गुलाब आहे. तो आपलाच आहे. बापूजी (mahatma gandhi) जीवन ही ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. व मानवतेला अलंकृत करावी, हे तुम्ही शिकवले. हीच सुंदरतम प्रेरणा आहे.

बापुजी, पत्र संपले तरी आपल्या हृदयातील संवाद अखंड राहील.

यशेंद्र क्षीरसागर

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu