abhyas kasa karava – अभ्यास कसा करावा 100%

abhyas kasa karava

abhyas kasa karava – अभ्यास कसा करावा – तुम्हाला वाटतं का की, अभ्यास जिथे आपण करतो ती जागा महत्त्वाची आहे. कशी असावी ती जागा जेणेकरून तुमचा अभ्यासात मन लागेल आणि तुमचा कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल

मित्रांनो तुम्ही रोज पाच ते सहा तास अभ्यास करत असालच किंवा तुम्ही एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर त्याहूनही जास्त वेळ तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला अशा ठिकाणी बसावं लागेल जेथे तुमचं मन अभ्यासात गुंतेल.त्याचप्रमाणे अभ्यासही चांगल्या प्रकारे होईल त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक ताण ही या अभ्यासामुळे वाढला नाही पाहिजे.

जागा :- (abhyas kasa karava)

मित्रांनो अभ्यास करण्याची जागा ही फार महत्वाची आहे कारण त्याच्यामुळे तुमचा अभ्यासातील रुची वाढते आणि कमी वेळेत तुम्ही जास्त अभ्यास करू शकता. जर तुम्ही बेडवर बसून अभ्यास करत असाल तर, पहिल्या पंधरा-वीस मिनिटात तुम्ही बसून अभ्यास कराल त्यानंतरच्या पंधरा-वीस मिनिटांनी तुम्ही पाय पसरून अभ्यास कराल आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे थोड्याच वेळात तुम्ही झोपाल. म्हणजे सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी की अभ्यासाची जागा इतकी पण आरामशीर नको की तुम्हाला झोप येईल.

माध्यम :-

(abhyas kasa karava)

अभ्यासासाठी तुम्ही अभ्यासाचे टेबल आणि खुर्ची याचा वापर करू शकता, हेच योग्य आहे, कारण जर तुम्ही जमिनीवर बसून जरी अभ्यास केला तरी पुन्हा तो बेडचा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून तुम्ही स्टडी स्टेबल वरचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे स्टडी टेबल नसेल तर निदान खुर्चीचा तरी वापर करावा. तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे मार्केटमध्ये छोटासा टेबल येतो ज्याद्वारे तुम्ही खाली बसून सुद्धा अभ्यास करू शकता. हा टेबल तुम्हाला ऑनलाईन केव्हा तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकेल. आता आपण बघूया की अभ्यासाची जागा कोणती असेल अभ्यासाला बसताना एकाच जागेवर बसून का एकाच ठिकाणी अभ्यास करावा की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा, महत्त्वाचे असे आहे कि जिथे तुम्ही अभ्यास करतात त्या जागेचा दुसऱ्या गोष्टीसाठी वापर करणे टाळा, म्हणजेच तिथे बसून मोबाईल वापरणे किंवा गेम खेळणे अशा गोष्टी करणे टाळा त्यामुळे काय होईल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसाल त्यावेळेस तुम्ही अभ्यासच करत असाल असं तुम्हाला वाटत राहील आणि तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये रुची वाढेल.

भावना :-

(abhyas kasa karava)

जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना ठरलेल्या जागेवर अभ्यास करायला आवडते, कारण त्या जागेशी त्यांचा असं नातं जुळलेलं असतं की, त्यामुळे असे त्यांना वाटतं की त्या ठिकाणी अभ्यास केल्यामुळे आपला अभ्यास होईल. आपल्या अभ्यासाच्या भावना त्या जागेशी जोडल्या गेलेल्या असतात. पण एकाच जागी किंवा एकाच ठिकाणी बसून अभ्यास करणे योग्य आहे का की दर दोन-तीन तासांनी आपल्याला ती जागा बदलावी. मित्रांनो सगळ्यांचे नेचर सेम आहे आपण लगेच प्रत्येक वेळेस नवीन जागेत जाण्यास किंवा तिथे अभ्यास करण्यास टाळतो हे फक्त अभ्यासाच्या जागेचा बाबतीत नाही तर इतर बाबतीत सुद्धा आपण सारखे बदल टाळतो कारण आपला एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो आणि ह्या कम्फर्ट झोन मधून आपण बाहेर येण्यास टाळतो आपल्याला त्याच वातावरणात वावरायला आवडतं ज्या वातावरणात आपण आनंदी असतो पण काही नवीन आपण ट्राय केलं तर यापेक्षा चांगल आपलं होऊ शकत.

रिसर्च काय सांगतो?

(abhyas kasa karava)

मित्रांनो अभ्यासाद्वारे आणि रिसर्च द्वारे हे प्रमाणित झाल आहे की, प्रत्येक दोन-तीन तासाने आपण अभ्यासाची जागा बदलली तर आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो. आपला अभ्यासात चांगलं लक्ष लागून राहते. त्याचं कारण अस आहे की नवीन जागेत आपण बसल्यावर आपण अस अनुभवतो की आपण आत्ताच अभ्यासाला बसलो आहे. ती जागा तुमच्यासाठी नवीन असते त्यामुळे तुम्हालाही ते फ्रेश वाटतं, त्यामुळे तुम्हाला वाटतं की, हा माझा पहिला अभ्यास आहे आणि मला अभ्यासाला बसल्याबसल्या ताजतवानं वाटत आहे जुन्या जागेचा विचार करायला गेलो तर ,त्याच ठिकाणी बसून बसून तुम्ही कंटाळवाणं फील करतात. त्या जागेत काही तास तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. तुमच्यात ती एनर्जी राहिलेली नसते. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या काही तासानंतर जागा बदल करणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही अभ्यासाची जागा कोणतीही असो, ती घर असो किंवा कुठलीही लायब्ररी असो तिथे तुम्ही दोन-तीन जागा अशा निवडून ठेवा. ज्या जागेवर तुम्ही प्रत्येक ठराविक तासानंतर त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता. हा पण लायब्ररीत तुम्हाला दोन-तीन ठिकाणी टेबल आणि खुर्ची मिळू शकेल परंतु घरामध्ये ती उपलब्ध होणार नाही. मग घरामध्ये अभ्यास करताना टेबल आणि खुर्ची ची जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही लिखाणाचं आणि होम वर्क करू शकता. आणि वाचन किंवा इतर अभ्यास करत असाल तर एखादे दुसऱ्या ठिकाणी फक्त खुर्चीवर बसून ते तुम्ही करू शकता आणि मोठ्या मोठ्याने वाचन किंवा पाठांतर असेल तर तुम्ही टेरेसवर थंड हवेच्या ठिकाणी अभ्यास करू शकता, तर अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या जागा बदलून तुमचा अभ्यास करू शकता,

बदलाची गरज :-

(abhyas kasa karava)

परंतु मघाशी सांगितल्याप्रमाणे नवीन जागेत अभ्यास करणे किंवा नवीन जागा निवडणे आपण टाळतो, कारण ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत. पण तुम्ही प्रयत्न करायला हवा. दोन-तीन जागा अशा निवडा जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि काही पाच सहा दिवसात तुम्हाला प्रयत्न करून कॉन्सन्ट्रेशन करावे लागेल. त्याच वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. पाच-सात दिवसापर्यंत नक्कीच तुम्हाला लक्ष लागणार नाही, कारण ती जागा नवीन असेल. परंतु चांगला अभ्यास आणि परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी असे करणे गरजेचे आहे, पण जर मनच लागत नसेल तर थोडा माईन्ड प्रोग्रामिंग करा. नवीन ठिकाणी अभ्यास करताना तुम्ही मनातल्या मनात ठरवा की, याठिकाणी बसल्यानंतर माझा चांगला अभ्यास होतो. मला आनंद वाटतो आणि मी कायम याठिकाणी अभ्यास करेन. याची मला खात्री वाटते, जर सतत तुम्ही मनाला असं सांगत राहिला, तर तुम्ही नवीन जागेत सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल.
वरील बदलामुळे तुम्ही नक्कीच चांगला अभ्यास करू शकाल यात दुमत नाही परंतु त्यासाठी तुमचे प्रयत्न आणि चिकाटी तुमच्या बरोबर असणे फार गरजेचे आहे.

(abhyas kasa karava)

All The Best.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu