marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

शांत सुंदर बुद्धिवंतांचा
देवालाही वाटतो सहारा।
त्याच्याही ‘हृदया’वर असेल आता
केवळ नितू मांडके यांचा पहारा॥

रे राज्यकर्त्या, झगडत रहा,
शुष्क पर्णासम झडू नको!
माणसांची दौलत जमवत राहा,
सोन्या- चांदी साठी रडू नको!

झोपडीसमोर तुळशी वृंदावन
पावित्र्य तिचे विसरू नको
मल्टिप्लेक्सच्या फरशीवरून
तत्त्वांसह घसरू नको

लाल गुलाल, उष्ण घोषणा
बिनचेहज्यांची गर्दी मोठी
सेवा करताना एकटाच असशील
आधाराला गांधींची काठी

कर्तृत्वाचा शिलालेख
उसन्या दगडावर कोरू नको
चिमणीएवढेच काम कर
पण श्रेय कुणाचे चोरू नको!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu