marathi kavita – आहे तिथेच अजूनही – Great – #1 Best for youth

marathi kavita

आहे तिथेच अजूनही

आमच्या काळ्या मिचकट शरीराचा
त्यांना अजूनही येतो वास
म्हणूनच सीमेवर कललेली
दिसतील तुम्हाला आमची बुटकी घरे

तिकडे गावात राहतात रूबाबात
स्वातंत्र्याची मधाळ पिल्ले
आणि आमची वस्ती म्हणजे
गुलामीचा अनटचेबल डाग

काळे हात चालतात त्यांना राबायला रानात
नको त्यांना आम्ही उत्सवात, नारळा-खणात
भीमाच्या बाळांची फरफट २०११ मध्येही
कशाला घटनेची पूजा वाड्यात अन् पालातही?

आत गाभाऱ्यात मस्ती चालते
आणि देवळाबाहेर आमची गस्त
गोया हातांनी घंटानाद
शिवाय ग्रांथिक सुंदर वाद
बाहेर रापलेली उपाशी पोटे
घामाचा मग पोटभर स्वाद!

आमच्या छातीवर उगवली जातीची झाडे
त्यांची मुळे शरीरात भेदून रुतलेली जमिनीत
धर्माच्या छातीवर पोसलेली गोरी गिधाडे
चोच त्यांची आमच्या छातीत (हदयात)

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu