marathi kavita – पायरीवर वारकरी – Great – #1 Best for youth

marathi kavita

पायरीवर वारकरी

पांडुरंग पांडुरंगकरीत कुजत असतो

एखादी पांढरी टोपी पांडुरंगाच्या पायाला नासवून जाते

त्याला महापूजा म्हटलं जातं

वारकऱ्यांचं मदं चंद्रभागेत वाहून जातं.

बुसरा दिवशी त्या टोपीसकट पांडुरंगाला फोटोत बघावे लागतं

वारकऱ्याच्या त्या मनाला माझ्या पोत्यात तसंच कोंबावं लागतं

काय करायचं? विसरावं लागतं!

माझं पोतं आता विकायचं आहे

जीर्ण झालंय… विदीर्ण झालंय

त्याच त्याच मेंदूला पांघरूण

त्याच त्याच भावनांनी

सडून गेलंय

काय करायचं? भरजरी कपड्यातल्या माणसात

बिनकपड्याचं फिरावं लागतं

शेवटी माझं तेच पोतं मला विकावं लागतं

कारण दुसऱ्या दिवशी मला

नवं पोतं घ्यायचं असतं!

Marathi Kavita in English

‘Panduranga panduranga’ karita kujata asato

ekhadi pandhari topi pandurangacya payala nasavuna jate

tyala mahapuja mhatalam jatam

varakaryancam madam candrabhageta vahuna jatam.

Busara divasi tya topisakata pandurangala photota baghave lagatam

varakaryacya tya manala majhya potyata tasanca kombavam lagatam

kaya karayacam? Visaravam lagatam!

Majham potam ata vikayacam ahe

jirna jhalanya… Vidirna jhalanya

tyaca tyaca mendula pangharuna

tyaca tyaca bhavananni

saduna gelanya

kaya karayacam? Bharajari kapadyatalya manasata

binakapadyacam phiravam lagatam

sevati majham teca potam mala vikavam lagatam

karana dusarya divasi mala

navam potam ghyayacam asatam

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

marathi kavita

Homesearch google

Leave a Reply

Close Menu