marathi kavita – बगळे – Great – #1 Best for youth

marathi kavita

बगळे

दिवसभर
शब्दांचे भाले खूपसून
भाषणांच्या
तुफानी बंदुकांनी
तुमचे हृदय भावना बंबाळ
करतील
मनाचे देव्हारे
पैशाने, उदाधुपांनी उजळून
टाकतील
ते… बगळे

आणि मग
आज रात्री
तुमच्याकडून मिळालेले
मतांचे गढे
खुंटीला टांगून
दारू- मटणाच्या चिखलात
स्वतःला लोळवतील
तुमचे
ते… बगळे

Marathi Kavita in English

Divasabhara
sabdance bhale khupasuna
bhasanancya
tuphani bandukanni
tumace hrdaya bhavana bambala
karatila
manace devhare
paisane, udadhupanni ujaluna
takatila
te… Bagale

ani maga
aja ratri
tumacyakaduna milalele
matance gadhe
khuntila tanguna
daru- matanacya cikhalata
svatahla lolavatila
tumace
te… Bagale

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu