marathi kavita – बाकी – Great – #1 Best for youth

marathi kavita

बाकी

चौकात एका मध्यभागी

एक पुतळा उभा होता
मख्ख… निश्चल…

लोक म्हणायचे, तो एक

थोर पुरुष होता
पण असे म्हणण्यापलीकडे
ते काहीच करायला नाही धजायचे

बन्या झोपड्या होत्या पुतळ्या भोवती
सर्वत्र दारिङ्रघच

एकदा तर खून झाला, त्या

पुतळ्याच्या अगदी पायथ्याशी
तो पुतळा काहीच बोलला नाही
कारण तो थोर पुरुषाचा होता ना!

एव्हाना सर्वांचे दुर्लक्ष झेलणाऱ्या
त्या पुतळ्याकडे फक्त
एक कबूतर लक्ष देऊन होते
कारण जगात उरलेसुरले
तेवढेच शांतीचे प्रतीक शिल्लक होते!

 

Marathi Kavita in English

Caukata eka madhyabhagi

eka putala ubha hota
makhkha… Niscala…

Loka mhanayace, to eka

thora purusa hota
pana ase mhananyapalikade
te kahica karayala nahi dhajayace

ban’ya jhopadya hotya putalya bhovati
sarvatra darinraghaca

ekada tara khuna jhala, tya

putalyacya agadi payathyasi
to putala kahica bolala nahi
karana to thora purusaca hota na!

Evhana sarvance durlaksa jhelanarya
tya putalyakade phakta
eka kabutara laksa de’una hote
karana jagata uralesurale
tevadheca santice pratika sillaka hote

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu