marathi kavita – रहाटगाडगे – Great – #1 Best for youth

marathi kavita

रहाटगाडगे

फोनच होता मोबाईल
आता तत्त्वे मोबाईल झाली
हलू लागली इकडेतिकडे
जाच्या त्याचा फायदा काय
सवाल करती रोकडे!

पूर्वी एकापुढे अनेक शून्ये
असली तरी त्याचे अब्ज होत

उदाहरणार्थ गांधीजी.
आता शून्यापासून सुरवात…आणि पुढेही शून्येच
आता चर्चा क्रिकेटची, हुकलेल्या विकेटची
२३ मार्चला कॉटर फायनल आहे!
(त्याच दिवशी शहीद दिन… कोण जाणे बापुडा!)

कॉलेजच्या गेटवर तंग जीन्स
आणि एका पोरामागे शेकडो कीन्स
तरुण खिंकाळतो ए ग्रेड सीन्स!

बारक्या विचारतो- व्हॉट इट मीन्स?
जीवनावर इतकी श्रद्धा, इतका विश्वास
जो तो म्हणतो-साला जिंदगी एक बकवास!
सकाळ येते घेऊन एक अशुख श्वास
घाईघाईत आतडे रवी प्रदूषित घास

हुरडा पार्टी ‘धावल्या वर बसली
दारूची बाटली सरबतावर रुसली
प्रगती तर होतेय-वंचना कसली?
दारिद्र्यरेषा काळजात घुसली!
जिवंत आहेस ना?
मग कशाला शोधतोस जीवनाचा अर्थ!
अरे गुंतव- सारे दुप्पट कर
बाकी आदर्शाचा गुंता व्यर्थ!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu