marathi kavita – श्रद्धांजली – Great – #1 Best for youth

marathi kavita

श्रद्धांजली

आता तिघे कुठे असतील
शरीरात प्राण तर नाही
आयुष्यात जान तर नाही
आज जागतिक महिला दिन… आठ मार्च २०११
कुठे कुठे साजरा होतोय
आणि इकडे ‘आज तक चा निर्जीव पडदा म्हणाला,
१९व्या मजल्यावरून ती गेली
आणि तिची दोन कच्चीबच्चीही!
वय तीन, वय अकरा, दोन्हीही शरीरे गेली
महिला दिनालाच महिला शहीद झाली
‘इस धिस इज अ मोस्ट सेलेबल न्यूज’

रक्ताचे चिमुकले गोळे
खाली पडताना रडले असतील?
आईच्या पदरात दडले असतील?
हे प्रश्न हृदयात मावणारे नाहीत
महिला दिन थाटात
भरपूर अन्न पोटात
तेवढेच शिल्लक ताटात
आणि कार्यक्रम संपल्यावर
जो- तो जाण्याच्या घाईत

माईकवरून घोषणा
थोडा वेळ प्लीज बसा…
दोनच मिनिटांत श्रद्धांजली उरकून घेऊ

Marathi English In Marathi

Ata tighe kuthe asatila
sarirata prana tara nahi
ayusyata jana tara nahi
aja jagatika mahila dina… Atha marca 2011
kuthe kuthe sajara hotoya
ani ikade’aja taka ca nirjiva padada mhanala,
19vya majalyavaruna ti geli
ani tici dona kaccibaccihi!
Vaya tina, vaya akara, donhihi sarire geli
mahila dinalaca mahila sahida jhali
‘isa dhisa ija a mosta selebala n’yuja’

raktace cimukale gole
khali padatana radale asatila?
A’icya padarata dadale asatila?
He prasna hrdayata mavanare nahita
mahila dina thatata
bharapura anna potata
tevadheca sillaka tatata
ani karyakrama sampalyavara
jo- to janyacya gha’ita

ma’ikavaruna ghosana
thoda vela plija basa…
Donaca minitanta srad’dhanjali urakuna ghe’u

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu