marathi kavita-भारतीय संस्कृती- Best -#1 Longest Poem In India

marathi kavita

longest Poem In India 

भारतातील सर्वात मोठी कविता – लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

दीर्घकविता –

भारतीय संस्कृती

इथे आहे ईश्वर आणि सुवर्णभूमी हीच आहे,
भारत जगाचा मार्गदर्शक; मानवता इथली रीत आहे!
सेवा धर्म हाच खरा बाकी सर्व झूठ आहे,
एकता ही सर्वोपरी; हीच वज्रमूठ आहे!
गावे गीत मानवतेचे; बाकी व्यवहार नको,मा
प्रेम करतो एकमेका; कुणावर कधी वार नको!
संत कबीर, मदर तेरेसा यांची ही भूमी आहे,
भारावलेली मने आणि डोळ्यात थंड नमी आहे!
जन्माला आले विश्व अन् पालनकर्ता आनंदी,
जीव असावेत ममतायुक्‍त अन् जीवन स्‍वच्छंदी!
अश्रू खरे तर सुंदर ठेवा; हीच आहे संपत्‍ती,
दुर्गुण ठेवा काळकोठडीत; होऊ दे खुशाल उपरती!
जन्म, प्रेम करण्यासाठी; नव्हे तो मित्रा द्वेषासाठी,
ईश्वराने निर्मिली धरती; आनंदभरे नांदण्यासाठी!
नको राग मनात तुझिया, अंकुर फुटू दे नवा,
माणुसकीचे बीज पेरूनी; वृक्ष डोलू दे नवा!
असते सुंदर अवघे विश्व कोवळ्या बाळासम,
दृष्‍टी हवी तशीच कोमल भिजल्‍या पाकळीसम!
संस्‍कृती आपुली नितांत सुंदर; पूजनीय ती आहे,
दोष आपुले, पापे आपुली, झाकुनी पवित्र राहे!
संवेदना ती जपून ठेवा; देव्हार्‍यातील पणती जशी,
मानवताही तशीच असते; हरवून चालेल कशी!
भूतदया ही नितांत मंगल, तोच जगण्याचा पाया,
माणुसकीवीण जगणे म्‍हणजे जगणे व्यर्थ अन्‌वाया!
संतांची ही परंपरा, आपणास खुणावत आहे,
त्‍यांची विचारधारा अवघे मन व्यापुनी राहे!
संत हेचि मानवतेचे, आधारस्‍तंभ अवघे,
तेच आपुले सच्चे साथी; सुज्ञास सांगणे न लगे!
माणुसकीचे झरेच निर्मळ, संतांचे जीवन हे,
लक्षलक्ष राम तेजाळती, जळले पिशाच्च रावण ते!
एक एक क्षण संतांचा, माणुसकीच्या ज्‍योतीसाठी,
ठेवून गेले असंख्य आदर्श, प्रेमभराने आपल्‍यासाठी!
त्‍या आदर्शा, त्‍या जीवना शत शत प्रणाम आहे,
आपण त्‍यासम व्हावे; जीवनी तरच राम आहे!
माणुसकीचा धर्म न जाणे वेशभूषा, जात काय,
जीवनाला प्रगल्‍भ करते मानवतेची प्रेममयी गाय!
उदात्त मूल्‍ये जपणे हेच जीवितकर्म असावे,
माणसासारखे जीवन जगणे; यातच श्वास वसावे!
हे विश्वचि माझे घर; ज्ञानदेव सांगून गेले,
संकुचित हे जगणे; तयांनी विश्वरूप केले!
जणू भारतभू विशाल सागर, मूल्‍यांचा ठेवा,
मानवतेच्या आकाशाला; जणू स्‍पर्श हा नवा!
माणुसकी हे मूल्‍य पहा, जगी कसे अमर आहे,
भारत त्‍याचा हा मुकुटमणी, विश्वात अखंड शोभूनी राहे!
हेच आहे बलस्‍थान जगाचे, जयाचे मानवता हे नाव,
व्यर्थ कमाई तुमची आणिक, व्यर्थ तुमचे नाव-गाव!
नररत्‍न जन्मले कित्‍येक येथे, अजरामर अन्‌होऊन गेले,
भारतमूल्‍यांची पहाट ही झाली, आनंदे जगाच्या भरते आले!
परोपकाराचा श्वेत तुषार हा, शांत समुद्री न्हातआहे,
माझ्या देशाच्या हृदयात पहा, अखंड मानवता राहात आहे!
नदी, पर्वत, पठार, सागर, सांगा कोठे प्रेम नाही,
पीयुष कुंभ ओसंडती येथे, ज्यात मानवता सुखात राही!
दगड ज्‍या देशात केवळ, काय तयाला मोल आहे,
देश आदर्श हा भारतभू, विश्व अवघे व्यापून राहे!
इतिहास इथला प्रसन्न केवळ, माणसाला इथे महत्त्व आहे,
निर्जीव दगड अन्‌ गोट्यांतही, येथे अनोखे सत्‍व आहे!
आम्‍ही ना पाहतो कागदी धर्म, ज्‍यात स्‍वार्थाचा वास असतो,
तेथे तर शुद्ध मानुषतेचा, अनावर होत र्‍हास असतो!
शिवबा येथेच झाले जाज्ज्वल्‍य, माणसासाठी ते अखंड लढले,
आईचा पदर अन्‌ माणुसकीच्या, मुशीतूनच हे सोने घडले!
गड जिंकले; ते धोंडे होते, मात्र त्‍यांचे; चैतन्यमयी गात्र,
येथील मातीचा कण प्रत्‍येक गातो, मानवतेचे महन्मंगल स्‍तोत्र!
घोड्यांच्या होत्या टापा आणि
मनात भगिनींचे अश्रू होते,
माणुसकीची ती ओढ अनावर
मोहरे हरेक गवताचे पाते!
साम्राज्य नको; स्वराज्य हवे,
सिंहासनाची तयाला तमा नव्हती,
एकच मनीषा; माझा माणूस जगावा,
इवल्या हातात खड्गाची पाती!
मृत्यूच्या दरबारी ते लढले,
माणूस आणि माणुसकीला जपण्यासाठी
अखंड भारती ज्वाला उसळल्या
लखाकले देव्हारे तेजाचे; काळोखाच्या पाठी.
तडिताघात किती झाले या भूवर
परी आम्ही न डगमगलो
तिमिर असे किती भुंकत आले.
पाठीवरती सूर्य; आम्ही झोकात झगमगलो
पिसाळलेल्या सर्वांनी; कितीक सांडले विष.
संहार असे विखारी झाले.
जणू बाळाचे नाजूक ओठ,
तसे मानवतेचे अमृत झाले.
काश्मीर असो की कन्याकुमारी,
येथील माणूस पिचला नाही.
व्हावे श्रीमंत; उन्मत्‍त पिपासू,
विचार असा कधी रुजला नाही….
अहो जन्मला भारत तोच,
सोज्वळ तनूचा बांधा घेऊन
बद्ध आमुचे जीवन अवघे,
भाळी प्रेमाचा टिळा लेऊन
होतो येथे कधी कधी,
रंगांचा बेफाम स्‍वार्थी लिलाव
हा या धर्माचा; तो त्‍या,
होतात परस्‍पर घातकी ठराव
ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल गीता,
येतात अशाच वेळी; एकत्र धावून.
आणि फेर धरतात संस्‍कारांचा,
चलबिचल मनांचे तांडव पाहून.
आम्‍ही बिथरतो, आम्‍ही धगधगतो,
कळत नाही, कधी काय करावे
मग मानवतेचा दीप तेवतो,
ग्रंथांच्या ओंजळीत आत्‍म्‍याने तरावे!
अद्वैत, निरामय, स्‍वच्छ अन सुंदर,
परंपरा इथे धर्मातीत आहे!
प्रत्‍येकाचे रक्‍त लालच अन्‌,
रक्‍तात एकत्‍वाचे गीत आहे
इथल्‍या नद्या, इथले पर्वत, आणि वारा;
अफाट समुद्र देखील,
गुंजन ऐका हलकेच तुम्‍ही,
निर्मळ प्रेमाची ग्‍वाही देतील!
भारतवर्ष दिक्‍कालाच्या मुशीत घडले,
रोम अन्‌ रोम पवित्र येथे
आम्‍ही पडलो तरीही घडलो,
मानवधर्म हेच सूत्र जेथे!
अनादिअनंत, महन्मंगल, चांगुलपणा,
सत्ता नको; आम्‍हा सत्‍य हवे
इथली मूल्‍ये, अखंड अजर,
हिरव्याकंच पालवीचे; धुमारे नित्‍य नवे!
साधू संत अन्‌ क्रांतिकारक,
सर्वांचा आत्‍मा एक आहे.
मंजुळ वारा की तुफानी वादळ,
मातीचा इरादा नेक आहे
सुविचार, कुविचार, मतभेद, मनभेद,
माणूस आहे म्‍हणून सर्व
परि आहेत या चंचल अफाट,
इथला पाऊस पडतो प्रत्‍येक घरावर
शेतावर, बंगल्‍यावर, ऑफिसवर,
रस्‍त्‍यांवर, खड्ड्यांमध्ये-ओढ्यांमध्ये
पण पाणी येथे नितळ आहे,
प्रत्‍येकाच्या मालकीचे कातळ आहे.
स्‍वस्‍त, महाग, सुलभ, दुर्लभ,
पर्वा आम्‍ही कधी केली नाही
मी तुझा – तू माझा ही,
नशा कधी उतरली नाही.
क्षितिजाचा भगवा रंग आणि
भगव्याच कफन्या आमच्या साधूंच्या
हे रंग तर निर्गुणाचे – थोडे दुर्लभ!
कौतुक होते आणि आहे मात्र
बुबुळांना भावणार्‍या सगुणाचे.
मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा
हा तर संस्‍कृतीचा अर्क आहे
भ्‍याडांनी हे समजू नये की
तीच आमची प्रतीके आहेत एकमेव.
भारत उतला नाही-मातला नाही,
जगाच्या प्रेमात, विश्वाच्या पसार्‍यात,
आम्‍ही कधी बिब्‍बा घातला नाही.
बुवांचे कीर्तन आणि शास्‍त्रज्ञांची अणुभट्टी
दोन्हींचा आम्‍हाला सोस आहे – अभंग !
बुवांचा आर्त स्‍वर, अणुभट्टीचे फॉर्म्युले
दोन्ही मंगळ, दोन्ही आनंदमय – उत्तुंग !!
कित्‍येक अस्‍मानी संकटे, झेलली माणुसकीने
तरीही मलाल कधी भिनला नाही रक्‍तामध्ये.
शुभ, सत्‍य, शिव, सुंदर
पवित्र आणि शुचिर्भूत
राहिलो आम्‍ही-मळलो अन्‌
धुतलेही गेलो अवचित सद्‌गुणांनी.
अंतर्वर्ती मूल्‍यांचा ध्यास अनावर,
कोरत गेलो अखंड हृदयावर.
शूर शिपाई-संत महंत
सारेच आमचे ईश्वर अनंत.
अफाट धरती अन कोटी बंधू,
भले असतील काही संधीसाधू,
तयांना वगळून; हुशार आम्‍ही.
मोट अलगद सुंदर बांधू!!
पडलो, झडलो क्‍वचित सडलो
कधी घरी; कधी दारी – नडलो !
स्वकियांच्या कधी
परकियांच्या रक्तात भिजलो
कधी गादीच्या, नादात शिजलो
असे आम्‍ही मर्दच राहिलो
आतला आवाज मरू दिला नाही.
ग्रंथांचा श्वास गुदमरू दिला नाही.
ग्रंथांची पाने माखली धुळीने,
आणि मुडदे पडले हारीने,
कुठूनतरी गगनभेदी आर्त हाक
मानवतेची येते आणि शर्मतो आम्‍ही.
पुन्हा इतिहासाची गरम पाने लखाखतात,
शिवाला सुंदराची-शरीराला आत्‍म्‍याची,
आत्‍म्‍याला परमात्‍म्‍याची साद येते.
स्‍वच्छ, नितळ, कातरवेळी
परंपरेची अद्‌भुत याद येते !!
मदर तेरेसा, बाबा आमटे
गाडगे महाराज, संत कबीर
गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, नामदेव
ही तर इथली ‘कायम ठेव’
ही ठेव संपत नाही-हटत नाही
अवचित ती वाढतच जाते
देव्हारा हे आध्यात्‍मिक रणांगण
आमचे लढणे सात्‍विक असते
मी मोठा की मोठा पेल्यातले वादळ.
अन्‌ ते क्षणिक नुसते!
ज्ञानोबांचे, निवृत्तीचे, सोपानाचे मुक्ताचे !
पर्व इथले पहा खरोखर,
क्षितिजस्‍पर्शी निखळ भक्‍तीचे!!
त्‍या भावंडांचे पाय म्‍हणजे,
या मातीतच्या अजर भक्‍तीचे.
पृथ्‍वीत रोवलेले अमर आधारस्‍तंभ !!
श्री ज्ञानेश्वरीचा प्रत्‍येक शब्‍द
भारताच्या कणाकणातील अमर्त्य आपुलकीचा
जणू जगत्‌दर्शी अपार दीपस्‍तंभ !
भावंडांची गाथा; म्‍हणजे केवळ
कुणाच्या हालअपेष्‍टांचे मोहोळ नाही
की ते निव्वळ केवळ,
संतत्‍वाचे शांत कमळ नाही.
तो आहे माणसाकडून माणसाकडे
जाण्याचा एक आरपार मार्ग.
शुद्ध-निरंतर-तिमिरभेदी-आकाशछेदी
मुले आली आणि गेली.
एवढाच त्‍याचा अर्थ नाही
वाङ्‌मयाचा तो घाट न् केवळ
तो आश्वासक विचार आहे.
भारतपुरुषाचा तो आचार आहे
नामदेवांचा तो अखंड-चिरस्‍थानी उद्‌गार
‘एक तरी ओवी अनुभवावी-’
देशातल्‍या प्रत्‍येक मुखाने ही ओवी गावी
माणुसकीच्या हरेक वेदनेवर
प्रेमळ उत्तर शोधणारी ज्ञानेश्वरी.
बेफाम संकटांच्या कभिन्न खडकांतून
पवित्र निर्झरवाट खोदणारी ज्ञानेश्वरी.
तत्‍वज्ञानाचे वलय अखंड भेदत
सुखाची निर्झरवाट शोधणारी ज्ञानेश्वरी
अश्रूंना नव्या अर्थाचे पसायदान-
– मागून; जीवनमर्म उच्चरवाने सांगत
‘विश्वाचे आर्त’ श्वासात बांधणारी ज्ञानेश्वरी.
तो आहे का केवळ ‘अध्याय’
की आहे केवळ ‘ओवी’,
नित्‍य नूतन अर्थ हरअक्षरी दावी.
ज्ञानोबांचे जीवन हा चमत्‍कार नाही
उज्‍ज्‍वल भारतीय संस्‍कृतीचे ते तर
एक उत्‍कट प्रतिबिंब !
जिवंत राहाणे आणि खरे जगणे
यातली भेदरेषा अधोरेखित करणारा
तो तर एक संस्‍कारसुगंधी जीवनपट !
म्‍हणूनच तर –
एखादा दिव्य अंश अंगात असतो
तरी पोराबाळांत आम्‍हाला ज्ञानेश्वर दिसतो
इथे तिथे, इकडे- तिकडे
वारकर्‍यांच्या दिंडीत चोहीकडे.
झाडांत पानात पुस्‍तकात रानात
ग्रंथांत, इमारतीत-वनात
ज्ञानेश्वर अखंड भिनला आहे.
भारतीयाच्या प्रत्‍येक पिढीने,
हा दिव्य संत जाणला आहे.
इथेच तर होते तेजाची आरती
आणि संत -महंत शेकडो येथे
प्रत्‍येक युगात तेवत आले,
आणि गाभारे अजरामर झाले.
शिखर प्रत्‍येक मंदिराचे आकाशाला भिडले
इथेच संतांच्या सुगंधी संगतीने
दगड-गोटेही मनस्वी गहिवरले!
मातीच्या प्रत्येक कणाला संस्‍कार लाभला,
प्रत्‍येक अंकुर तरारून मातीला जागला.
भगवा रंग-हिरवा रंग – निळा रंग
‘‘अवघा रंग एक झाला’’- कुणी संत
कातर स्‍वरात मंदिरदारी गहिवरला
संत या मातीतले नसतात कधीच
नुसतेच ‘भिक्षुक’, नसतात नुसतेच मागतकरी
त्‍यांच्या अस्‍तित्‍वाला असतो एक गोड रंग.
संस्‍कारी अंग आणि तेजोमयी शलाका.
जी कधी रंगून जाते – ओम नमः शिवायच्या गजरात.
तरी कधी रंगून जाते – अल्‍ला हो अकबरच्या निनादात
तर कधी रंगून जाते – ‘GOD BLESS YOU’च्या आर्त स्‍वरात.
मग भक्‍त-माती-संत एकच होतात
देवत्‍वाच्या भिंतीवर नकाशे कोरतात -माणुसकीचे.
हा भक्‍त – तो ईश्वर – ही माती – तो महंत
असा भेदच मग नुरतो.
कोणी म्‍हणोत – ‘‘श्री स्‍वामी समर्थ ’’
कोणी म्‍हणोत – ‘‘अल्लख निरंजन’’
कोणी म्‍हणोत – ‘‘दुर्गा माता की जय’’
तर कोणी बालक ‘‘जय हनुमान’’ चा नारा लावतो
प्रत्‍येक युगात माणूस इथे अधिकच ‘माणूस’झाला.
दोन घरांच्या भिंती एकमेकीच्या मैत्रिणी झाल्‍या.
आणि घरे दोस्‍त तर अंगण झाले मैत्रीचा श्वास.
धर्म अर्थ काम मोक्ष –
हेच आहे भारतीयत्‍वाचे खरेखुरे आधारस्‍तंभ.
यातूनच घडतो नवनागरिक अन्‌
पताका फडकत राहते मानवतेची
मोह-मत्‍सर-माया- आम्‍हांस, ना भ्रांत ना चिंता
आम्‍ही मिसळत जातो मातीच्या गर्भात
अन्‌ अंकुर बहरतो संस्‍कृतीचा.
शाश्वत सुखाचाच इथे डंका;
ना क्षणभंगुरतेची लालसा इथे
सुंदर – प्रेमळ – सुजलाम – सुफलाम
भूमीचे पुत्र नांदतात एकोप्याने,
नवपुत्र फुटतात धुमार्‍यासारखे इथल्‍या
सृजनशीलतेच्या गर्भातून ध्येयवेडे होऊन.
पुरुषार्थाची शिकवण आणि बीजे रुजत
राहिली, धरित्रीच्या पोटात – संस्‍कृती पाझरत गेली
काम हा पुरुषार्थ दिसतसे पवित्र.
अन्‌ श्लील येथे हाच पुरुषार्थ.
धर्माची ग्‍लानी येत नाही कुणाला,
धर्मच देतो उभारी मनाला.
धर्माचीच अपत्‍ये गोपी अन ग्‍वाला
धर्म म्‍हणजे नाही निव्वळ पोषाख
धर्म म्‍हणजे नाही केवळ धाक
धर्म म्‍हणजे अर्थपूर्ण जीवन
जगण्याचे वर्णन करणारी पवित्र ओवी.
जी हरेक जीवाने येथे श्लोकासम गावी.
लाखो वर्षे सोसत आलो,
स्‍वतःलाच स्‍वतःच्या कसोटीवर
अविरत पोसीत-घासीत आलो.
ही संस्‍कृती म्‍हणजे जगण्याचा
एक शाश्वत अविरत मंत्र.
आणि सुखाचे एक अमर तंत्र
आम्‍ही कधी मातलो नाही
आम्‍ही कधी ऊतलो नाही
कुणाला कधी नडलो नाही
उगा चिंतेत सडलो नाही,
नृत्‍य-शिल्‍प-अभिनय-शेती
हरेक सण आणि हरेक कण
आमचा रोजचाच एक श्वास झाला
पशूही असा वागवला जसा,
एक माणूसच असावा-घरातला.
प्रत्‍येक शब्‍द असा आळवला
की श्वास सुगंधी ऊरातला
नदी आणि माती आमची आहे.
आम्‍ही निव्वळ जिवंत नसतो
तर जगत असतो अविचल
संस्‍कृतीच्या बोटांना धरून प्रेमाने
म्‍हणून नदी ही आई आहे
आमच्या संस्‍कृतीच्या दिव्य परंपरेची
आम्‍ही घेतो शपथ हरक्षणी,
जशी आईची; तशीच धरेची.
सोसायला शिकवले या संस्‍कृतीने,
सोशिक झाले अनंत पिढीजन !
सूड उगवायचा कुणी कुणावर,
कुणी पाहावे कुणाचे कलेवर !!
म्‍हणूनच मरावे तर दुसर्‍यासाठी.
मरण यावे तर पवित्र नदीच्या काठी
संस्‍कृतीची व्याख्या रुजत गेली
आमच्या जीवनात सजत गेली
संस्‍कृती म्‍हणजे जगण्याची पद्धत
जी भारतात शुद्धतम आहे.
नदीचे पाणी पाहा ना…
वाहात राहाते अविरत, निश्चल, शांतपणे
ती माती सुगंधी कपाळी लावा
माती काढत नाही कुणाचे ऊणे दुणे
ही माती- ती नदी,
या संस्‍कृतीचा अर्क आहे !
प्रेम करावे, प्रेमच करावे,
हाच तिचा अंतिम तर्क आहे !!
केले असतील कधी वार कुणी
संस्‍कृतीने पाठराखण केली नाही !
अशा लबाडी,बनवेगिरीची

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

 

marathi kavita

Homesearch google

Leave a Reply

Close Menu