marathi kavita – हरवलेला गाव – Great – #1 Best for youth

marathi kavita

हरवलेला गाव

डोंगराच्या जवळजवळ टोकावर
खुलून दिसते एक मंदिर
जणू दैत्याच्या अन्यायी छातीत
खुपसला कुणी खोल खंजीर

वर पटांगण सभोवती झाडे
सळसळ पाणी आणि बेभान
वाण्याची चाल
विस्तीर्ण प्रदेश मोकळा

कळस चुंबितो आभाळाचे गाल
डोंगराच्या पायथ्याला, टेकडीच्या
आडोशाला
लपले भोळे बडे खेडे
अर्धी झाकलेली माणसे तेथे
आणि गर्दीत गच्च झाडे

थोडी भाकर खाऊन जा
अश्शी मधाळ बोली
दूर कुठे मरून पडल्या

शहराच्या तिरकस चाली
गवता- कुडाच्या गावाशेजारी
निर्मळ पाण्याचे चमचमते तळे
पोटभर घास एवढेच स्वप्न
कुणी कुणावर ना जळे

केवळ कष्ट अन् झोप अभंग
गोड नाती, दूर धर्म आणि जाती
ईश्वराने तेथेच कशी
ओंजळ केली रीती।

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu