marathi kavita – होळी – Great – #1 Best for youth

marathi kavita

होळी

असंखय वाटांवरील प्रेमबिंदूंचा
त्यांना सोस नाही
रक्तपाटांनी जरी तलवारी भिजल्या
त्यांना रोष नाही

महात्म्यांच्या अशरूंनी तिरंगे भिजून गेले.
लाखो गोळ्यांनी अनेक छात्यांचे बुरुज लखलखले
त्या अणूंची, त्या गोळ्यांची
खंत त्यांना नाही
लखलखत्या बुरुजात नहाण्याची

उसंत त्यांना नाही
प्रेम पूजा बांधण्यात आयुष्य ज्यांचे सरले
उधारीत जगाला ज्यांचे स्वत्वही न उरले
प्रेम पूजेतील फुलांचा
मोह त्यांना नाही
त्या स्वत्वाच्या राखेची
चाड त्यांना नाही

धावा, पळा, कापा हाच त्यांचा मंत्र
मानवतेच्या होळीत जळते त्याचे गान गान
या मंत्रावीण जीवन त्यांचे
जीवन असत नाही
होळीच्या ज्वाळात त्यांचे
मन भाजत नाही…

Marathi Kavita in English

Asankhaya vatanvarila premabindunca
tyanna sosa nahi
raktapatanni jari talavari bhijalya
tyanna rosa nahi

mahatmyancya asarunni tirange bhijuna gele.
Lakho golyanni aneka chatyance buruja lakhalakhale
tya anunci, tya golyanci
khanta tyanna nahi
lakhalakhatya burujata nahanyaci

usanta tyanna nahi
prema puja bandhanyata ayusya jyance sarale
udharita jagala jyance svatvahi na urale
prema pujetila phulanca
moha tyanna nahi
tya svatvacya rakheci
cada tyanna nahi

dhava, pala, kapa haca tyanca mantra
manavatecya holita jalate tyace gana gana
ya mantravina jivana tyance
jivana asata nahi
holicya jvalata tyance
mana bhajata nahi…

 

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu