Marathi Kavita – अर्धशतक – #369 – The Best

Marathi Kavita – अर्धशतक

अर्धशतक पूर्ण जहाले अमुच्या लढ्याला,
काय घडले काय न घडले सांगू कोणाला.
सर्वांसाठी करत राहिलो विचार मनी ना कपी आला,
काय कमवले काय गमवले सांगू कोणाला.
भाऊ विसरले भावाला बहिण विसरली बहिणीला,
दीर विसरले वहिनीला मने अमुची सुन जहाली,
काय म्हणावे या नात्याला?
चार पुत्र कुशी जन्मले जणु कतृत्वाची खाण,
त्यांच्या कर्तृत्वे कशी उजळली घराण्याची शान,
तशाच मिळाल्या चार सुना सुशिल, सोशिक, गुणी,
असे सर्व बघून आम्ही सुखावलो मनोमनी.
त्यांच्या संसार वेलीवर उमलल्या पाचकळ्या आणि दोन फुल,
सर्व असे हे बयुनी मना पडली सुंदर भुल.
बालपणी फुलपाखरू उडताना पाहिले,
आपणास का येईल उडता असे मनी वाटले.
स्वप्नातही नव्हते पाहिले पेऊन आलो गगनी झेप,
परदेशातील वैभव बापूने हे नेत्र मिटले अपोआप.
सर्व कसे बघ भरून पावलो काही न उरली आस मनी,
पती, पुत्र, नाती, नातू आणि सुना.
श्री गणेशा कुटुंब माझे सुखी राहुदे, हात जोडीते पुन्हा पुन्हा..

Leave a Reply

Close Menu