marathi kavita – बोथट – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #7

बोथट

तो खूश आहे… जेव्हापासून
शिक्षणाचे कंत्राट मिळाले
शिक्षकावरील संस्कारांचे
ओझे अचानक गळाले

आता मॅगी आणि बर्गरहूनही
शिक्षक आहे स्वस्त
निर्जीव दुकानात गुरूचे ग्रंथ
धूळ खात मस्त

साने गुरुजींचे नकली कपडे
आत सारा भुसाच आहे
आता संस्कारही लिमिटेड
कारण पगारच तसा आहे

आम्ही जे सुंदर शिकलो
ते आम्ही का शिकवू?
पिढीच्या मस्तकी विस्तव ठेवून
आम्ही व्यवस्थेला वाकवू

गुरु रब्ंडा, गुरु विष्णु
कंत्राटी संस्कारकर्ता वर्धिष्णू
गुरुर्देवो महेश्वरा…
नोकरीचा ध्वज उंच धरा..!

Marathi Kavita In English

To khusa ahe… jevhapasuna
siksanace kantrata milale
siksakavarila sanskarance
ojhe acanaka galale

ata megi ani bargarahunahi
siksaka ahe svasta
nirjiva dukanata guruce grantha
dhula khata masta

sane gurujince nakali kapade
ata sara bhusaca ahe
ata sanskarahi limiteda
karana pagaraca tasa ahe

amhi je sundara sikalo
te amhi ka sikavu?
Pidhicya mastaki vistava thevuna
amhi vyavasthela vakavu

guru rabnda, guru visnu
kantrati sanskarakarta vardhisnu
gururdevo mahesvara…
nokarica dhvaja unca dhara..!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu