Marathi Kavita – चुकलेलं गणित – #369 – The Best

Marathi Kavita – चुकलेलं गणित

जिवन म्हणजे एक गणित बेरीज वजाबाकी
गुणाकार भागाकार जमा आणि खर्च
एवढेच मला माहित होते की सरळ
गणित करणे, पण रीत बदलली,चढती
भाजणी आली मग बीजबणित आले
आता तर अ, ब, क, ह…. आले आहे
त्यामुळे आमचे जुने गणित हरवून गेले
नव्याला महत्व आले
कसेही मांडले तरी आमचे गणित पटत नाही
आम्ही सर्व चुकतो असेच झाले आहे
काही बोला कसेही सांगा, कितीही पटवून वा
पण आमचे उत्तर शेवटी चुकीचेच ठरत आहे.
कारण आमचे जिवनाचेच गणित चुकले आहे

Leave a Reply

Close Menu