Marathi Kavita – घर – #369 – The Best

Marathi Kavita – घर

प्रत्येक बाईचं एक स्वप्न असतं
असावं आपलं हक्काचं घर
तिला तिथे कुणी न म्हणावे बाजुला सर
घर तिचं विश्व असतं त्यात गुंतलेल असतं मन
त्याचच तिने घराभोवती केल असतं कुंपण
तिये तिने मांडलेला असतो संसाराचा थाट
सर्वांच्यासाठी असते घरात प्रेमाची वाट
जपलेली असतात प्रेमाची नाती
उभारलेल्या असतात कर्तृत्वाच्या भिंती
तिथे तिने फुलवलेला असतो मुला-फुलांचा मळा
म्हणून त्या घराचा तिला असतो खूप खूप लळा
मनासून असतो सर्वाच्या सुखाचा ध्यास
त्याचा पराभोवती दरवळतो सुगंधी वास
तिथे तिने पाहिलेले असतात आनंदाचे, सुखाचे सोहोळे
बरे-वाईट, दुःख सर्व सोसलेले असते
यर तिच सर्वस्व आठवणींचा ठेवा
तो नेहमी तिच्याजवळ रहावा
म्हणूनचं वाटत हक्काचं घर असावं
तिथून तिला कोणी उठं म्हणणार नसावं.

Leave a Reply

Close Menu