Marathi Kavita – गुलमोहर – #369 – The Best

Marathi Kavita – गुलमोहर

जगामध्ये देवाची बघ अगाध ही करणी
सुटतो वारा येतो पाऊस तृप्त ती धरणी
ग्रीष्मा मध्ये वृक्षाला बघ कशी फुटे पालवी
बसून सुंदर तो गुलमोहर मनी झुला झुलवी
बालपणी बघ गुलमोहराचे झाड मनी ठसले
दारामध्ये झाड लावीन बघ बोलून मी बसले
झाड लावण्या नाही जमले तरी खेद नसे हा मनी
पाहीन जेथे तेथे तुजला डोळे भरुनी सुखावेन मी मनी

Leave a Reply

Close Menu