Marathi Kavita – जगा वेगळी आई – #369 – The Best

Marathi Kavita – जगा वेगळी आई

जगामध्ये आई सारखे दुसरे दैवत बघ नाही
म्हणून सांगते तीज विसरू नको म्हणे आई
आईला उलटून बोलू नको वेड्या जीवा
तिने केला तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा तो दिवा
कितीही चिडली रागवून बोलली क्षणात सारे विसरुन बघ जाई
आणि मनी म्हणतसे आरे बाळा तुझ्यामुळे मी झाले आई
आईचा आशिर्वाद जगती किती आहे थोर आणि अनमोल
तो आकाशा सारखा विशाल आणि पृथ्वी एवढा गोल
आई मुलाचे नाते असते किती दृट आणि गोड
कितीही उपमा दिल्या तरी त्यास जगी नसे तोड
प्रेमाने तु आई म्हणुनी हाक मारता ती सुखावून जाई
एवढेच तीज हवे असते, आणिक नच काही
बालपणीची आठवण येता, मनी अंगाई गाई
आठवणीने भरला अ ती हेलावून जाई
जेव्हा बाळा कळेल तुजला आईची महती
टाहो फोडून आई म्हणूनी हाक मारशिल
ती नसेल या जगती
उपकाराची फेड तुझ्या मी कशी करू आई
एवढेच मी म्हणेन आता आई सारखे
दुसरे दैवत नाही.

Leave a Reply

Close Menu