Marathi Kavita – जखम – #369 – The Best

Marathi Kavita – जखम

आठवणींच्या उतारावर मन धरेना थारा
जसा निसटतोय हातातून पारा
थोडावेळ मन विसावलं असं वाटतयं
पाठीला उनं चटचट भाजतयं
तेवढ्यात एक खोल जखमं
आठवणींचा फोड फोडून जाते
साचलेल मळभळ निचरून जाते
अनुभवाचे मलम लावले जाते
कालांतराचे बँडेज बांधले जाते
जखम बरी होते निदान वर-वर तरी
आठवणीची जखम कधीच बरी होणारी नसते
आपण फक्त त्याच्यावर प्रेमाची फुंकर घालायची असते.

Leave a Reply

Close Menu