marathi kavita – जीवन घात – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #5

जीवन घात

जन्म आणि मृत्यू या दोन
अटळ पूर्णविरामांच्या मपले
सरपटत जाणारे वाक्य
म्हणजेच जीवन

अनुभवांचे हिरवे नाग
जीवनाच्या टोपलीत कोंबले
पोट भरायची वेळ आल्यावर
मात्र एकही नाग

आनंदाने डोलेना
अंधारातल्या काही श्वासांच्या
उलघालीचा परिणाम
म्हणजेच आपला जन्म
कोणत्यातरी बेभान क्षणी
दोन जिवांनी घेतलेल्या
मदमस्त फिरकीनंतर
त्यांना आलेली चक्कर
म्हणजेच आपण

जेव्हा नालायक माणसं
आपल्या जीवनाच्या ढुंगणावर
बिनधास्त चापट मारतात
तेव्हा वाटते…
आपली वांझोटी इजत
उंदीर कुरतडत आहे
अशा चंढ चापटींचा
आता सरावच झालाय
जीवन आणि अशूचा
तसा ठरावच झालाय

Marathi Kavita In English

Janma ani mrtyu ya dona
atala purnaviramancya mapale
sarapatata janare vakya
mhanajeca jivana

anubhavance hirave naga
jivanacya topalita kombale
pota bharayaci vela alyavara
matra ekahi naga

anandane dolena
andharatalya kahi svasancya
ulaghalica parinama
mhanajeca apala janma
konatyatari bebhana ksani
dona jivanni ghetalelya
madamasta phirakinantara
tyanna aleli cakkara
mhanajeca apana

jevha nalayaka manasam
apalya jivanacya dhunganavara
binadhasta capata maratata
tevha vatate…
apali vanjhoti ijata
undira kuratadata ahe
asa candha capatinca
ata saravaca jhalaya
jivana ani asuca
tasa tharavaca jhalaya

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu