Marathi Kavita – कर्ण – #369 – The Best

Marathi Kavita – कर्ण

चुकून असतो एखादा उदार कर्ण आपली कवच कुंडले आणि
अंत्यविधीस काढून देणारा सोन्याचा दात
आता आहेत मृतांच्या अंगावरचे दागिने आणि
कपडे चोरणारी जात
चुकून असतो एखादा राज्य देऊन राजा बनविणारा
दुर्योधनासारखा खरा मित्र
स्वार्यासाठी जिकडेतिकडे झाले आहे खोटया मैत्रीचे सत्र
चुकून असतो एखादा रामासारखा एकवचनी
आज्ञाधारक पुत्र महान
म्हणूनच त्याला मिळाले भरत-लक्ष्मणासारखे बंधू आणि एकनिष्ठ हनुमान
चुकून असतो एखादा आई-वडिलांची सेवा करणार श्रावण बाळ
आता आई-वडिलांशी कसे बोलावे-वागावे याला राहिला नाही ताल
चुकून असतो द्रौपदी वर खर प्रेम करणारा श्रीकृष्णासारखा बंधू
बंधू कुठले सगळे झालेत संधी सायू
चुकून असते एखादी श्रीकृष्णावर खर प्रेम करणारी वेडी राधा
उठसुठ ज्याला त्याला झाली आहे खोटया प्रेमाची बाधा
चुकून असते एखादी श्रीकृष्णावर भक्तीप्रेम करणारी मीरा
पहावे तिकडे झाला आहे जादूचा बाजार सारा
चुकून असते एखादी देवकीचे बाळ सांभाळणारी यशोदा माई
आता आपलीच मुले सांभाळायला यांना वेळ नाही

Leave a Reply

Close Menu