marathi kavita – कवितेने काय दिले? – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #4

कवितेने काय दिले?

कवितेने काय दिले?

कवितेने पाय दिले
तिच्यासोबत चालताना
दुःखांना आम्ही ‘बाय’ केले

कवितेने काय दिले?

कवितेने त्राण दिले
जीवघेण्या वेदनांना
तिनेच तर प्राण दिले

कवितेने काय दिले?

कवितेने कान दिले
सुंदर सुंदर विचारांचे
हिरवेगार रान दिले

कवितेने काय दिले?

कवितेने भान दिले
आयुष्याचे रंग उडता
त्याला नवे वाण दिले

कवितेने काय दिले?
कवितेने मन दिले
उघड्या उघड्या जखमांना
तिनेच तर प्राण दिले

Marathi Kavita In English

Kavitene kaya dile?

Kavitene paya dile
ticyasobata calatana
duhkhanna amhi’baya’ kele

kavitene kaya dile?

Kavitene trana dile
jivaghenya vedananna
tineca tara prana dile

kavitene kaya dile?

Kavitene kana dile
sundara sundara vicarance
hiravegara rana dile

kavitene kaya dile?

Kavitene bhana dile
ayusyace ranga udata
tyala nave vana dile

kavitene kaya dile?
Kavitene mana dile
ughadya ughadya jakhamanna
tineca tara prana dile

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu