marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

देवाला म्हणालो, ‘आमच्या भल्यासाठी
राहा इलेक्शन ला उभा’
तो म्हणाला, ‘बेस्ट ऑफ लक
गाजवा तुम्हीच सभा

माझ्या गाभाऱ्यात भक्तांना
आश्वासनं चालत नाहीत
झूल पांघरून जाहीरनामे
लोटांगणे घालत नाहीत

नेते काय, मतदार काय
सगळीच माझी मुले
कर्माने होतो कोण ‘हिटलर’
तर कोण ‘महात्मा फुले

देव म्हणाला, ‘निवडून या;
पण जपा लोकसेवेचे व्रत
मी कधीच निवडून आलोय
मिळवून ज्ञाना- तुकाचे मत

जयजयकार आणि संपत्तीचा
मला कुठे ‘सोस’ आहे
थोडाफार नैवेद्य मिळतो
तव्यावरच मी ‘खूष’ आहे!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu