marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कोण म्हणतं महागाई आली?
त्यांचं ‘चिंतन’ मस्त आहे
राजकीय ‘बाजारात’ फिरून पाहा
राम बराच ‘स्वस्त’ आहे

भारत असो वा पाक
गरिबांना ‘वोन वेळची’ भ्रांत आहे,
लाखो जिवांचे लोणी पचवून
इस्लामाबाद ‘बोका’ शांत आहे!

आता विश्वात्मके देवे
सीमेने तरी किती सोसावे?
तोषोनि आम्हास द्यावे
अतिरेक्यांचे प्राण हे!

वाजपेयीसाहेब आम्हाला
युद्धातले काही कळत नाही
तुमच्यासारखे आम्ही,
तेच तेच दळण दळते नाही!!

सत्तेच्या कडू शिवारात
साखर पेरणी पुरे झाली,
गोडवा संपून राजकारणाची
‘मळी’ उरली खाली!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu