marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कन्येसाठी जनता लुटली
यादव सारे ‘वन्य’ झाले
लालू ‘येती’ लालू ‘जाती’
कित्तेक तुरुंग ‘धन्य’ झाले!

हातघाईवर आले सरकार दरबार
‘घड्याळाचे काटे वेळीच जागले
टपली जरी ‘धनुष्य कमळे
फुलाचे मरण ओठावर भागले!

शाहरुख, सलमानच्या बाटलीमध्ये
‘पारो चे ऐश्वर्या जागे आहे
एक देवदास पडद्यावर,
दुसरा पडद्यामागे आहे

बाप ज्याचा ‘हात’ पाठीवर
कुणी ‘खलनायक’ उन्मत्त आहे!
कराची, दुबईत त्यांची ‘देवळे
तिकडेच त्यांचा ‘दत्त’ आहे!!

आमुचे कमळ स्वच्छ आहे
आरोप करणारेच पिले असतील
राम नाईक कुठे दिसेनात
पेट्रोल पंपावर गेले असतील!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu