marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

‘मधुघट पिले गेल्या पिढ्यांनी, चंद्र कित्येक पाहिले
आताशा कुण्या नवोदितेचा, रोजच मधुचंद्र आहे!

या बिपाशा तून सुटावे कसे? तनही उघडे मनही उघडे
संस्कृतीची ओरड मुकी, गांजला स्वरकोष आहे!

प्रेम यात्री गोड होते, मधुर त्यांची प्रीत होती
आता ते ‘निकम्मे झाले, इश्क त्यांचे कंबखत आहे!

न-कलाकार इथे राहिले, कलाकार दुबईत गेले
खरा ‘संजय’ दिसेना ‘दत्त’ मंदिरात धृतराष्ट्र आहे!

ओलेती होती अभिनेत्री तेव्हा, आता नायक अर्धनग्न झाला
‘खान’दाऱ्यांच्या ऐश्वर्यात मद्याची बरसात आहे!

शांताराम होते आणिक बिमल रॉय होते जेथे
दुपार चिमण्या पाखरांची, मात्र मॉर्निंग प्रौढांसाठी आहे!

कोण सुलोचना? कोण मधुबाला? नट्यांचे कपडे रिटायर झाले
‘कॉम्प्रमाईजचे’ दिवस सुगीचे, रातीची तर बात आहे!

मदर इंडिया-मुगले आझम, आता हृदयास तसा पीळ नाही
याच आशेवर येतो आणि नासतो प्रत्येक शुक्रवार आहे!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu