marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कोणी, किती लाख खाल्ले
ही बाब गौण असते
गप्प राहुन ही अण्णा ‘बोलतात
जनतेचे नेहमीच ‘मौन’ असते!

‘जया’ अंगी मोठेपण
तयाने साठी गाठली,
अभिषेकच्या ‘करिष्म्या’साठीच
आता जीवन रेखा’ आटली!

उगीचच इतका ‘मान’ दिला
मन आता ‘सल’तय
गोरगरिबाचा जीव घेऊन
‘ऐश्वर्या कडे कलतंय!

कामगाराचा जीव स्वर्गात पोचला
बोले- न्याय आता मागू कोणाला?
मीही अजून उपाशीच आहे

काळविटाचा आत्मा हळूच म्हणाला
‘राळेगणसिद्धी’ तळमळते
माहितीचा अधिकार नाही!
आम्ही बापुडे, आम्हाला
अधिकाराचीच माहिती नाही!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu