marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कोर्ट म्हणाले, एका ‘स्टोरी’साठी
का बसलीस तू ‘वाघाच्या पाठी?
न्यायाची ‘मनीषा’ मरून गेली,
उरलीय केवळ ‘हाऊसफुल ची पाटी!

बॉलीवूड संसदेत घुसले
संस्कृती ‘विनोद’ करणार आहे,
शत्रूच्या हाती आरोग्य गेले
पेशंट ‘खामोश’ होणार आहे!

‘कमजोर कडी’ निखळता निखळता
लाल कृष्णाची बासरी ‘उप’वर झाली!
‘पॉज’ घेऊन धोतर म्हणाले,
उरलेल्या काळाची कटकट गेली!!

भलतेच ‘लोक’ भलतीच ‘सेवा’ (?)
‘आयोगाचे’ असेही चाकर (I) आहेत!
भावी अधिकारी पुढे पुढे
मागे तुडुंब लॉकर आहेत!!

अध्यक्षांनी ‘समाज’ देता
विधानसभेत ‘कमळ’ खवळले
राजीनाम्याचे ‘नाट्य’ खेळता
सत्ता आणिक पाश आवळले

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu