marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

अमेरिकन डॉलर पाहून
‘आयोग’वाला पाघळला
‘वाणी’ आहे मधुर मात्र
‘शशिकांत डागाळली!

भ्रष्ट लेकरे, दारिद्र्य अश्रू
साहणार तू कशी,
आळंदीतून येई माऊली
आम्हासी तारण्याशी।।

भारनियमनाची भेट घेऊन
जगावेगळी दिवाळी आली
उठा उठा हो सकळजन
वीज मंडळात ‘दिवेलागण झाली!

प्रत्येक झोपडीत आम्हाला जरी
क्रांतीचा स्तंभ रोवायचा आहे!
सध्यातरी दिवाळीचा दिवा
कर्ज काढूनच लावायचा आहे!!

शहाजोगपणा आव आणणाऱ्यांना
‘देवदास ची वेदना पटत नाही
पापाचे घडे ‘भरत’ आले
तरी कोटींची चिंता सुटत नाही

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu