marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

न्यायालयाच्या बासरीतून जसे
कायद्याचे सूर जाऊ लागले.
कृष्णा च्या डोळ्यांतून मग
‘कावेरी चे पाणी वाहू लागले!

मंत्रिपदासाठी अपक्ष भुंगे
कमळातून जेव्हा बाहेर आले
हाताशी आलेली सत्ता पाहताच
कठोर असलेले ‘मुलायम’ झाले!

लोकशाहीचे ‘विकृत’ गाणे,
काश्मीर सुद्धा गाऊ लागले
एकमेकांकडे हप्त्याहप्त्याने
‘सीएम’ पद जाऊ लागले

राजगादीच्या दिव्य प्रकाशात
शब्दयज्ञाची ग्रंथतुला झाली
जणू ‘शरदा’च्या ‘अनंत’ चांदण्यात
शिवाजी ची तलवार न्हाली

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu