marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

अभिनय हा काय ‘विनोद’ आहे?
असला ‘अनर्थ’ पाहणार नाही
‘धावां साठी केस गेले
आता डोकेही राहणार नाही

मनातला दिवा पेटत नाही
हाच एक ‘पेच’ आहे
किती दिवाळी आल्या गेल्या
तरीही शहर ‘तेच’ आहे.

पाडापाडीत ‘पडलेले’ गोपी
संघर्ष यात्रेत धडपडले
आम्ही सरकार पाडणार नाही
साळसूदपणाने बडबडले

अनौरस नेत्यांना जन्म देत
एकेक दिवस रेटीत आहे
गांगरलेली लोकशाही
राजकारणाच्या मिठीत आहे

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu