marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

प्रगत तुम्ही प्रगत आम्ही
हृदयात जरी ‘जात’ आहे!
स्वच्छ देहाच्या पणतीमध्ये
विषमतेची एक ‘वात’ आहे!!

जाता जाताही अमृत शिंपणे
महान व्यक्तींची रीत आहे
भेंडी च्या ‘अध्यक्षीय’ खुर्चीमागे
‘मृत्युंजय गीत आहे

लाचार हास्याचं बाशिंग बांधून
‘सोनिया’च्या मंडपात मुख्यमंत्री जमले!
स्वाभिमानाच्या शेकोटीवर ‘हात’ शेकत
‘राहुल की प्रियंका’! चर्चेत रमले!!

वीरपन्नची मिशी संगणकाला म्हणाली
कसलं विज्ञान? कसली क्रांती
दोन राज्यांना खुशाल वाकवून
जंगलात मिळते खरीखुरी शांती!!

कला अकादमीच्या इमारतीमुळे
‘पु.लं’चा पुतळा हसतो आहे!
जनतेची हास्यास्पद’ स्थिती पाहून
हसता हसता अश्रू पुसतो आहे!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu