marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

मंडळाचे तिमिर जावो
विश्व ‘भारनियमन’ सूर्ये पाहो।
वीजबिले पाहून फोडती टाहो
– प्राणिजात ॥

ना ‘प्रभूचे’ ना ‘उद्धवाचे
कल्पवृक्ष गाती रक्ताचे गाणे
सुंदर आणिक ‘मनोहर’ कोकण
जाहले आता जुने पुराणे’

साखरेचा ‘भाव’ म्हणजे काय
हे जरी केव्हाच उमजले
साखरेचा ‘मार’ म्हणजे काय
हे ‘डिग्रज मुळे समजले

बहुधा आता पैलवानांना
किंमत उरणार नाही
कारण कुस्तीसाठी खासदारांना
लोकसभा पुरणार नाही

प्रगती की सूज? – माणूस
आतल्या आत फसतो आहे
कुठे भाकरीचा प्रश्न – कुठे
‘स्वस्तातील मोबाईल हसतो आहे

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu