marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

जुन्या आणि नव्या वर्षात
एकाच रात्रीचे अंतर आहे!
भुकेल्या पोटांची दरिद्री कथा
मागून पुढे निरंतर आहे!!

आरोप-प्रत्यारोप,
चिखलफेकीत
दिवस- रात्र सरते
फेसाळणार्या शैम्पेनपुरते
मग ‘अधिवेशन’ उरते!

तेवीसशे की चोवीसशे
राव, भाव ‘का-पुसता?
तिजोरी आपली जाणता ना
जागतिक बँकेचा रस्ता!

नाजूक कोवळे संमेलन
अलगद उमलून आले
सफेद ‘बाल’वाले सुद्धा
क्षणात ‘कुमार’ झाले!

जुने वर्ष नव्याला म्हणाले,
साहून जगाला जर्जर झालोय!
माफ कर मित्रा तुझ्यासाठी,
जुनीच दुखणी घेऊन आलोय!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu