marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

भाजी-भाकरीचा नंतर पाहू
नवे वारे, ‘पतंग’ नवा
कर्तृत्वात सुधार कशाला?
नेतृत्वात बदल हवा!

झिजला जरी ‘सोनिया’चा माथा
वजा’ झाली ‘विलास गाथा
‘गरिबाचं-‘चव्हाण’ फाट जाई
राजगादी ‘सुशील’ राहिली नाही

क-हाडच्या भूमीवर
साहित्यिकांचे वहाड
संमेलनाच्या पाठीवर
लाल दिव्यांचे बि हाड

काळया कोटाच्या गर्द सावलीत
बंदूक निवांत जगते
हे ‘राम’ म्हणत संसद मात्र

न्यायाचा जोगवा मागते
माणूस होताच वेठीला
आता प्राणीही धरला।
म्हणूनच उरला सुरला
‘हत्तीही बाजारात शिरला।

सत्ता भोगणाऱ्या कृष्णाने
खाल्ले सुदाम्याचे पोहे
आता अभंगांचा पराभव
हरले कबीराचे दोहे

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu