marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कबुतरांचे मारेकरी म्हणतात
ही क्रांती आहे, युद्ध नव्हे!
सर्वच जाणतात, व्हाईट हाऊसमध्ये
रावण आहे, बुद्ध नव्हे!!

रामाची ये द्वारी उभा क्षणभरी
तेणे सर्व निवडणुका जिंकियेल्या।
मंदिर मुखे म्हणा, ‘मंदिर मुखे म्हणा ॥
मतांची गणना कोण करी ॥

‘शांततेसाठी युद्ध’ हा
अजब संदेश धाडणार आहे
पुन्हा अमेरिका, वड्याचं ‘तेल’
वांग्यावरती काढणार आहे

वनवास आहे तोच
आणि तेच देवालय आहे
फरक एवढाच, तेव्हा अरण्य
आणि आता न्यायालय आहे

साथी संसद, धर्म संसद
खरे रक्षक कोण आहेत?
भारत एकमेव देश असावा
ज्याला संसदा दोन आहेत

अचानक ‘आठवले’ ऐक्य त्यांना
तत्त्वांना त्यांच्या टाळे लागले
मतपेटीच्या कुशीत भगव्या रंगाला
निळया रंगाचे डोहाळे लागले

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu