marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

अमेरिका म्हणते, दहशतवाद संपवू
जी त्यांचीच देन आहे
त्यांच्याच ना पाक’ मित्रांच्या कुशीत
खुशीत जगतो लादेन आहे.

मंदिर कोठे? मशिद कोठे?
का उगी समाजात त्रागा आहे?
देवाला ‘मनात ठेवू या.
‘वादग्रस्त नसलेली’, तीच एक जागा आहे!

८ मार्च आला गेला
अजूनही ‘महिला’ दीन आहे
पुरुषांच्या पायाशी
अशू ढाळत लीन आहे.

आमच्या वाया गेलेल्या वर्षाचे
हिशेब कधी जुळतील का?
लोकसेवा आयोग ग्रस्तांना’
काही राखीव जागा मिळतील का?

‘उष्ट्या बोरांची किंमत
त्यांना कधीही कळणार नाही
कितीही उत्खनन करा तुम्ही
शबरीशिवाय काही मिळणार नाही.

सत्तेच्या ‘खेळा’वरची अतिरिक्त ‘माया’
दिल्लीला आता रडायला लागली
घरच्या मैदानावर, घरच्या गड्याकडून
कमळाची विकेट पडायला लागली

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu