marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

लोकसभा म्हणाली मतपेटीला
किती करशील नखरे!
लोकशाहीच्या पिकावर बसली
हजार पक्षांची पाखरे।।

मतपेटी ने उत्तर दिले
खुशाल अश्रू ढाळ!
मोफत होते मनोरंजन

मतदारांच्या पायात चाळ!!
लोकसभा मग कोपऱ्यामध्ये
जाऊन रुसून बसली
नोटेवरच्या गांधींकडे
बघून उदास हसली!!

१९४७ च्या ऑगस्टची
आठवण तिला झाली!
झोळी होतीच फाटलेली

आता अशरूंनी झाली ओली!!
आता पाहा कसे ते
अचानक नम्र होतील
‘काय काका? काय मावशी?’
खोटे नमस्कार ऊतू येतील

निवडणूक झाल्यावर होईल
जनप्रेमाची बोथट धार
कळतात आम्हालाही
पांढऱ्या कपड्यांचे छुपे वार

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu