marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

नोकरी देणारा जो तो
कंत्राटदारासारखा वागतो आहे
जीवनाच्या बाजारात प्रत्येक बेकार
कान्ट्रॅक्ट बेसिस’वर जगतो आहे.

सामाजिक विषमतादेखील
आधुनिक युगाबरोबर पडणार आहे!
संगणकावर का होईना पण
जातीचा दाखला मिळणार आहे..!!

सामान्य महिलांवरील
भयानक अत्याचार
हा तर ‘किरकोळ गुंता’ आहे
ऐश्वर्या बाँडपटात दिसेल का?
याचीच देशाला चिंता आहे.

ऐकतो की उद्योग क्षेत्रात
सध्या प्रचंड मंदी आहे
खादी कापडाच्या उत्पादकांना
मात्र गल्लोगल्ली संधी आहे

बंद बाटलीत
अद्धा मरते!
बोकडाच्या ‘जिवा’वर
यात्रा भरते!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu