marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

‘सत्या’च्या ‘जंगलात’ शिरल्यावर
जिवंत माणसांना पडदा छळतो
रामूच्या ऊर्मीला जाग आल्यावर
‘भुता’लाही न्याय मिळतो.

खोटीनाटी सजवासजवी
जुने गाणे नव्याने म्हणते
रिमिक्स च्या बाभळीखाली

काटा लगा, म्हणत कण्हते
‘निळ्या’ आभाळी, देवाघरी माई
तुम्ही आमच्यासाठी जागू नका
ऐक्याचे पुराण, बाबासाहेबांना
‘आठवले तरी, सांगू नका

‘अन्नावरची वासना उडाली
हजारो’ प्रश्नांना उत्तर न्हाय!
त्यांची उडालेली झोप विचारते,
९ ऑगस्टच्या पोटात काय?

नव्या संख्या, नव्या गणिताचा
रोज नवा जश्न आहे।
‘उत्तर प्रदेशातील’ हाच तर
सर्वात मोठा प्रश्न’ आहे॥

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu