marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

रखरखीत उन्हाआधी
सुखद, गर्द सावली दाटते
ते इतके गोड बोलतात, की
‘डायबेटिस’ होण्याची भीती वाटते

गल्ली, बोळात, झोपडपट्टी
त्यांचा वावर वाढू लागला
घसा बसलेला तबलाही
सनईचे सूर काढू लागला

शुभ्र कपड्यांची काळजी कशाला?
ते गटार ओलांडत आले
घाणेरीचे फूल अचानक
गुलाबाचे झाले

मोठे मोठे म्हणता म्हणता
सामान्य झाले नेते
या दिवसात त्यांना
बाभळीखालीही झोप येते

ते श्रेष्ठ होते की नव्हते?
बडे बडे भांडत बसले
सावरकरांच्या डोळ्यांत तेव्हा
गांधीजीचे अशी दिसले

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu