marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

मंगल मावशी, इब्राहिम चाचा
डिसोझा अंकल, पाटील काका
कैद करून मताला मनात
सव्वा लाखाची मुठी झाका

बिनअर्थाच्या कोरड्या ओव्या;
शब्द कुणाचे झेलू नका
क्षणिक मोहाच्या तराजूमध्ये
भविष्य आपले तोलू नका

आकाश टेकले क्षितिजावर
यालाच म्हणतात भास
एक वेळच्या अन्नाने
चढेल का मूठभर मांस?

कधी कधी झोंबतोसुद्धा
सुखद वाटणारा वारा
एकच मत जादू करेल,
उतरेल त्यांचा तोरा!

सगळेच जर महाग आहे
मत तरी स्वस्त कशाला?
तुमचे नव्हे; त्यांचे भविष्य
आहे आपल्या उशाला!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu