marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

तुफान गर्दीचे
गोविंदाने तोंड ‘वळविले’
संमेलनातले ‘नाट्य
सिनेमाने पळवले!

गांधींच्या पुण्यभूमीतही
एखादी मेधा’ चिरडून जाते
‘अहिंसेची’ प्रेतयात्रा पाहून,
साबरमती धो धो रडते!

तुफानी पावसात,
गळणाऱ्या झोपड्यांनी
दुःखे माझी गिळून टाकली!
झोपड्यांमधून बिनधास्त फिरताना,
प्रत्येक झोपडी ज्ञानोबांची वाटली!!

राम मंदिर बांधण्याचा संकल्प
धनुष्याने’ केला
घरच्या घरीच ‘कमळाचा’
शिरच्छेद झाला!

‘आशा काल होता होता
काळरात्र झाली!
दुबई तिकीट मिळते,
उड्डाणपुलाच्या खाली!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu