marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

जागतिकीकरणाच्या रंगीत दुनियेत
भारताचे एक खेडे झाले
म्हणूनच निर्मळ झरा सोडून
लोक ‘कोल्ड्रिंक्स साठी वेडे झाले

मैत्रीचे ‘तिरंगी’ हात जपा
हा साधासुधा गेम नाही!
‘हिरव्या’ शेवाळावर, पाय कधी
घसरेल याचा नेम नाही!!

‘यादवांच्या सत्ता मंदिरात’
लाठीचा ‘प्रसाद’ जोमात आहे
घटना पडतेय आजारी
अन् लोकशाही ‘कोमा’त आहे

अन्याय, अत्याचार पूर्वीही होते
आता थोडे अती वाटते
दुःखात पिचून, प्रत्येक नागरिक
कवी होण्याची भीती वाटते

बज्या स्टार्सची जाहिरातबाजी
परंपरेला कापत आहे
खबरदार, जर सरबत प्याल
तुम्हा कोकाकोला शपथ आहे

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu