marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

‘मराठी’ लेकराच्या भुकेला कोंडा
आणि निजेला धोंडा आहे
मुंबा मातेच्या पदराखाली
शेजार- पाजाऱ्यांचा लोंढा आहे.

‘शिष्ट’मंडळावर लक्ष ठेवा
गमतीगमतीत फिरून जातील
नव्या जागा हेरून पुन्हा,
जुनेच सुरुंग पेखन जातील!

तहानली राणि, वाळली पाने
शुष्क डोळे, तापली धरा!
सीएम साहेब तुम्ही शांतपणे
निवडणुकांची काळजी करा!!

जळती माणसे, पेटते डबे
चूक आपलीच, घातपात नसावा
नितीश ऊर्जेचे रेल्वे मंत्री होणं
हाच मोठा अपघात असावा

कधी काळी जाणती होती,
ती मंडळी नेणती झाली
भ्रष्ट अंधारात, स्वातंत्र्याच्या
मशालीची पणती झाली

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu