marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

वचनभंग झाला जरी
पाक-अमेरिका ‘प्रीत’ आहे,
‘मान्यताप्राप्त’ घुसखोरीची
हीच तर खरी रीत आहे!

सव्वीस टक्क्यांच्या
‘गोय गोमट्या’ कुरणात
भारतीय’ बातमी चरणार आहे!
देशस्थांनी काय वाचावं
हे परदेशात ठरणार आहे!!

काल फारूख, आज ओमर
केवळ ‘टोपीची’ बदली झाली,
दिवस उगवतात ‘नव्या कोंबड्याने
पुन्हा स्वायत्ततेचि’ बांग दिली!

घरातल्या घरातलं ‘कमळ युद्ध
पदवीधरांना गोंजारून गेलं,
‘शरदाच्या शुभ्र चांदण्यात
‘प्रकाशाला’ अंधारून आलं!

उसनवारीची उदंड उधळण
अर्थव्यवस्था ‘अशक्त’ आहे
तिजोरीची ‘तब्येत सांगते
कर्मचारी ‘अतिरिक्त’ आहे!

मुरडते करिना
थिरकते बिपाशा,
गरमागरम पडद्यावर
संस्कृतीचा तमाशा!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu