marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

पेटती घरे उद्ध्वस्त मने
जिंदगी जरी जाळवीत आहे
शांत राहा, संसद आपुली
राग मोदी’ आळवीत आहे!

दक्षिणेकडे शिबिर, उत्तरेकडे शिबिर
नेता कोण कळेना!
तलवारी उदंड झाल्या, मात्र
‘शिवराय’ कोठे दिसेना!
हिंदुत्वाचा खेळ चाले,
राजकारणाच्या क्षितिजावरती
मतपेटीची थप्पड बसते
लोकशाहीच्या गालावरती!

राजकारणात येणारी प्रत्येक व्यक्ती
पैशाची ‘छंदीफंदी’ असते
प्रेमळ लोकसेवेला तेथे
कडक संचारबंदी’ असते!

हिंदुत्वाचा तळपता सूर्य
राजगादीच्या होमात जळाला!
‘कमळ’ असो, की ‘हात’ असो.
सावरकर कुणा न कळला!!

जे का रंगले गांजले,
मृतदेहांवरील त्यांच्या लोणी चाखले
तोची नेता ओळखावा,
राजकारणी तेथेची जाणावा!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu